ETV Bharat / bharat

NIRF Rankings 2023 : देशातील टॉप 10 विद्यापीठाच्या यादीत महाराष्ट्राचे एकही विद्यापीठ नाही! वाचा संपूर्ण यादी - महाराष्ट्रातील विद्यापीठांची रॅंकिंग

देशातील टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. या यादीत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 19 व्या क्रमांकावर आहे.

NIRF Rankings 2023
NIRF रँकिंग 2023
author img

By

Published : Jun 5, 2023, 6:48 PM IST

Updated : Jun 5, 2023, 7:46 PM IST

नवी दिल्ली : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची रॅंकिंग जारी केली आहे. विशेष म्हणजे या रॅंकिंगमध्ये महाराष्ट्राच्या एकाही विद्यापीठाचा टॉप 10 मध्ये समावेश नाही. राज्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असून रॅंकिंगमध्ये ते 19 व्या क्रमांकावर आहे.

  • IISC, Bangalore ranked best university followed by JNU and Jamia Millia Islamia as per the NIRF Ranking released by the Union Ministry of Education pic.twitter.com/Jvr1OixSHz

    — ANI (@ANI) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई विद्यापीठाची घसरण : या क्रमवारीत बेंगळुरूचे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) अव्वल स्थानी आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि जामिया मिलिया इस्लामियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावले आहे. या यादीत मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) 23 व्या स्थानी आहे. तर पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी 32 व्या क्रमांकावर आहे. मुंबई विद्यापीठ या क्रमवारीत 56 व्या स्थानी आहे.

मुंबई आयआयटीचा देशात तिसरा क्रमांक : ओव्हरऑल रॅंकिंगमध्ये मद्रास आयआयटी (IIT Madras) पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत मुंबई आयआयटीने (IIT Bombay) चौथा क्रमांक पटकावला आहे. तर इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई आयआयटीचा देशात तिसरा क्रमांक आहे. देशातील दंत महाविद्यालयांच्या क्रमवारीत पुण्याचे डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विद्यापीठांची रॅंकिंग :

  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स - बेंगळुरू
  2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - नवी दिल्ली
  3. जामिया मिलिया इस्लामिया - नवी दिल्ली
  4. जाधवपूर विद्यापीठ - कोलकाता
  5. बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी
  6. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन - मणिपाल
  7. अमृता विश्व विद्यापीठ - कोइम्बतूर
  8. वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - वेल्लोर
  9. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ - अलीगढ
  10. हैदराबाद विद्यापीठ - हैदराबाद

ओव्हरऑल रॅंकिंग :

  1. आयआयटी मद्रास - चेन्नई
  2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स - बेंगळुरू
  3. आयआयटी दिल्ली - नवी दिल्ली
  4. आयआयटी बॉम्बे - मुंबई
  5. आयआयटी कानपूर - कानपूर
  6. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) - नवी दिल्ली
  7. आयआयटी खरगपूर - खरगपूर
  8. आयआयटी रुरकी - रुरकी
  9. आयआयटी गुवाहाटी - गुवाहाटी
  10. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ - नवी दिल्ली

गेल्या वर्षी देखील IISc अव्वल स्थानी : विशेष म्हणजे 2022 मध्ये देखील, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूने 83.57 गुणांसह विद्यापीठ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (68.47 स्कोअर) आणि जामिया मिलिया इस्लामिया (65.91 स्कोअर) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

हेही वाचा :

  1. SSC Result 2023: दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नने मारली बाजी; लातूर विभाग राज्यात सातवा क्रमांकावर
  2. NEET UG 2023 : NEET UG 2023 OMR Sheets स्कॅन कॉपी अन् आन्सर की कशाप्रकारे करणार डाऊनलोड, जाणून घ्या
  3. MAH MBA CET 2023 चे निकाल जाहीर; येथून डाऊनलोड करा तुमचा निकाल

Last Updated : Jun 5, 2023, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.