ETV Bharat / bharat

कुंभ : निर्वाणी महामंडलेश्वरांच्या मृत्यूनंतर निरंजनी अखाड्याला जाग; म्हणाले महामारीमध्ये अशी गर्दी योग्य नाही - निर्वाणी अखाडा

निरंजनी अखाड्याचे सचिव रविंद्र पुरी महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की हरिद्वारमध्ये असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे आम्ही १७ एप्रिलला कुंभ मेळा आटोपता घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिलला होणाऱ्या शाही स्नानाबाबत अखाडा परिषद जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलू. या चौथ्या शाही स्नानामध्ये काही साधू सहभागी होतील.

Niranjani Akhada announces conclusion of Kumbh
कुंभ : निर्वाणी महामंडलेश्वरांच्या मृत्यूनंतर निरंजनी अखाड्याला जाग; म्हणाले महामारीमध्ये अशी गर्दी योग्य नाही
author img

By

Published : Apr 16, 2021, 12:25 PM IST

देहराडून : निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील १३ अखाड्यांपैकी पंचायती निरंजनी अखाड्याला जाग आली आहे. त्यांनी गुरुवारी १७ एप्रिलला कुंभमेळा संपणार असल्याची घोषणा केली आहे.

निरंजनी अखाड्याचे सचिव रविंद्र पुरी महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की हरिद्वारमध्ये असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे आम्ही १७ एप्रिलला कुंभ मेळा आटोपता घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिलला होणाऱ्या शाही स्नानाबाबत अखाडा परिषद जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलू. या चौथ्या शाही स्नानामध्ये काही साधू सहभागी होतील.

आचार्य महामंडलेश्वर कैलाश गिरी म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीमध्ये हरिद्वारमध्ये एवढी गर्दी करणे योग्य नाही. कित्येक साधू आणि कर्मचारी तसेच भाविकही आजारी पडले आहेत.

महानिर्वाणी अखाड्याचे महंत कोरोनामुळे कालवश..

दरम्यान, महा निर्वाणी अखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून ते हरिद्वारमध्ये आले होते. कुंभमेळ्यात कोरोनाने निधन होणारे कपिल देव हे पहिले मोठे संत आहेत. तसेच, गेल्या पाच दिवसांमध्ये कुंभमेळ्यातील एकूण २,१६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : कुंभ : हरिद्वारमध्ये आतापर्यंत तीस साधूंना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.