ETV Bharat / bharat

तामिळनाडूत धुव्वाधार : घर कोसळून 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील वेल्लोर येथील पेरनंबट येथे आज सकाळी संततधार पावसामुळे घर कोसळल्याने नऊ जणांचा झोपेतच मृत्यू (Nine killed in vellore house collapse) झाला. मृतांमध्ये 4 महिला, 4 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्याचवेळी या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी टीपी कुमारवेल पांडियन (Collector TP Kumarvel Pandian) यांनी ही माहिती दिली.

Nine killed in vellore house collapse
तामिळनाडूत घर कोसळून 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Nov 19, 2021, 6:04 PM IST

Updated : Nov 19, 2021, 7:32 PM IST

वेल्लोर (तामिळनाडू) - मुसळधार पावसाने तामिळनाडूतील एका कुटुंबावर कहर केला. वेल्लोर (vellore) जिल्ह्यातील येथील पेरनंबट येथे आज सकाळी संततधार पावसामुळे घर कोसळल्याने नऊ जणांचा झोपेतच मृत्यू (Nine killed in vellore house collapse) झाला. मृतांमध्ये 4 महिला, 4 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्याचवेळी या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी टीपी कुमारवेल पांडियन (Collector TP Kumarvel Pandian) यांनी ही माहिती दिली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे.

  • मृतांमध्ये चार मुलांसह चार महिला व एका पुरूषाचा समावेश -

तामिळनाडूच्या वेल्लोर येथे शुक्रवारी मुसळधार झाला. यापावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या जिल्ह्यातील पेरनंबूत येथे घर कोसळून झोपेतच नऊ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मृतांमध्ये चार महिला, चार मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. इतर 8 जणांना सुरक्षित करून पुढील औषधोपचारासाठी पेर्नमबुत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पेरणंबूत शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

  • झोपेत असताना घडली घटना -

दरम्यान, "कुटुंब झोपेत असताना ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे ते राहिलेले घर कोसळले. जुन्या इमारतीची मजबुती अधिक वाईट होती आणि पावसाने अधिक जोर धरला होता," असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

  • मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहिर -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहिर केली आहे.

हेही वाचा - VIDEO : आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार....; तिरुमलामध्ये भूस्खलन तर चित्तूर जिल्ह्यात चार महिल्या गेल्या वाहून

Last Updated : Nov 19, 2021, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.