रांची - भिलाई येथील निकिता उपाध्याय या लिहिलेल्या पहिल्या पुस्तकामुळेच चर्चेत आल्या आहेत. त्यांची फोर्ब्स मॅगझीनने ३० हून कमी वयाच्या आशियाई व्यक्ती म्हणून निवड केली आहे. त्यांनी लिहिलेले रुट्स टू रेडियन्स या पुस्तकाला न्यूयॉर्कसह विविध आंतरराष्ट्रीय शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पुस्तकामुळे छत्तीसगडचे नाव उंचावल्याने मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी निकिता उपाध्याय यांचे अभिनंदन केले आहे. रुट्स टू रेडियन्स या पुस्तकात निकिता यांनी ५०० हून अधिक घरगुती ब्युटी टिप्स दिलेल्या आहेत. निकिता यांनी प्राथमिक शिक्षण भिलाई येथून घेतले आहे.
हेही वाचा-अलवरमध्ये आईच्या मृत्यूनंतर कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला; मुलींनी केले अंत्यसंस्कार
त्यानंतर फॅशनमधून एम. ए. व माध्यमात इंटर्न म्हणूनही नोकरी केली आहे. त्या छत्तीसगडविषयी पुस्तक लिहित आहेत. लवकरच हे पुस्तक पूर्ण होईल, असे निकिता उपाध्याय यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा-कोरानाची तिसरी लाट टाळणे शक्य नाही- केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा