त्रिची : पीएमके नेता थिरुपुवनम रामलिंगम यांच्या हत्येच्या तपासाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तामिळनाडूमधील 8 जिल्ह्यातील 24 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएनच्या 25 हून अधिक अधिकार्यांनी तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम, मेलाकावेरी, थिरुपुवनम आणि थिरुमंगलाकुडी अशा पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.
हत्येचा तपास सुरू: पीएमके नेता थिरुपुवनम रामलिंगम यांच्या हत्येच्या प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील फरार असलेल्या 5 जणांचा शोध एनआयएकडून केला जात आहे. आज राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील तंजावर,मदुराई आणि तिरुनेलवेलीसह 8 जिल्ह्यांतील 24 ठिकाणी छापे टाकले आहेत.
एनआयएचा छापा: एनआयएने कोईम्बतूर जिल्ह्यातील कोट्टाईमेडू भागात राहणारे PFIचे माजी प्रशासक यांच्या आप्पा या घरावरही छापा टाकला. त्यानंतर एनआयएने अफझल खान यांच्या निवासस्थानी छापा टाकाला.अफझल खान गेल्या 5 महिन्यांपासून मोहम्मद हुसेन यांच्या घरात भाड्याने राहत असल्याचेही सांगण्यात येत आहे. एनआयएचे निरीक्षक रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथकाने त्रिची येथे पीएमके नेत्याच्या हत्या प्रकरणात दोन साक्षीदारांसह अफजल खान यांची चौकशी केली. याचबरोबर एनआयएने तंजावर जिल्ह्यातील नटराजपूरम येथील बकरुद्दीनच्या घरावर आणि PFI चे माजी अध्यक्ष रशीद मोहम्मद यांच्या घरी छापे टाकले आहेत. ते पुदुकोट्टई जिल्ह्यातील उसिलनकुलम येथील रहिवासी आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मदुराई जिल्ह्यातील कामराज झाकीर हुसेन यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. तसेच पेरायूरजवळील एस.कीलापट्टी येथील रमन उर्फ अब्दुल रझाक यांच्या घरावरही छापा टाकला.
कोण आहेत तिरुपुवनम रामलिंगम? : 2019 मध्ये तिरुपुवनममध्ये धर्मांतराचा प्रचार थांबवल्याबद्दल थिरुपुवनम रामलिंगम यांची हत्या झाली होती. रामलिंगम हे म्युनिसिपल-स्तरीय प्रशासक होते आणि ते एक प्रमुख हिंदू नेता म्हणूनही काम करत होते. 5 फेब्रुवारी 2019 रोजी खून झालेल्या रामलिंगम यांच्या हत्येप्रकरणी तिरुविदाई मारुदुर पोलिसांनी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे. रामलिंगम हत्येचा खटला 14 मार्च 2019 रोजी राष्ट्रीय तपास एजन्सीकडे हस्तांतरित करण्यात आला.एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याचवर्षी 27 जून रोजी तेनकासी येथील गुरुकुलकू मस्जिद स्ट्रीट येथील अहमद सालिक याला अटक केली होती. त्यानंतर 3 जुलै 2019 रोजी एनआयएने अहमद सलिक यांच्या टेंकासी येथील घरावर छापा टाकला. परंतु अधिकाऱ्यांनी छाप्यातून काय गोष्टी जप्त केल्या याची माहिती दिली नाही.