शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मुलू चित्रगाम भागातील गाझी मोईन इस्लामच्या घरावर छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने शोपियान जिल्ह्यातील मुलू चित्रगाम भागातील गाझी मोईन इस्लामच्या घरावर छापा टाकला व तपासाच्या उद्देशाने त्याच्या बागेचीही झडती घेण्यात आली. (NIA raid in Shopian district).
सूत्रांकडून समजले की मोईन इस्लाम हा जमात अल बनात या अनाथाश्रम आणि शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष होता. एनआयएने हे छापे टेरर फंडिंग प्रकरणाच्या संदर्भात टाकले. (case of terror funding). या छाप्यांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.