- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या १९ जुलैपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत सरकार, विरोधी पक्षांना अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य मागणार आहे.
- दिल्ली पोलीस घेणार शेतकरी नेत्यांची भेट
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्याआधी दिल्ली पोलीस शेतकरी नेत्यांची भेट घेऊन आंदोलन दुसऱ्या स्थळी हलवण्याचे आवाहन करणार आहेत.
- सोनिया गांधीने काँग्रेस खासदारांची बोलावली बैठक
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला कोणत्या विषयावर घेरले पाहिजे, या विषयावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस खासदारांची बैठक बोलावली आहे.
- महागाई विरोधात राजद आज रस्त्यावर
महागाई विरोधात आज आणि उद्या राजदकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राजदचे तेजस्वी यादव आज पटना येथील कार्यालयात पत्रकाराशी संवाद साधणार आहेत.
- प्राजक्त तनपुरे संवाद साधणार
'महाराष्ट्रवादी चर्चा' या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमाद्वारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
- मराठा आक्रोश मोर्चा बाईक रॅली
आज सकाळी ८ वाजता नवी मुंबईमध्ये मराठा आक्रोश मोर्चा बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली ऐरोली ते माथाडी भवन वाशी या मार्गे काढली जाणार आहे.
- भारत-श्रीलंका आज पहिला एकदिवसीय सामना -
शिखर धवनच्या नेततृत्वात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. आज उभय संघातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना कोलंबो येथे रंगणार असून या सामन्याला दुपारी तीन वाजता सुरूवात होईल.
- इंग्लंड-पाकिस्तान दुसरा टी-२० सामना
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज लीड्समध्ये खेळला जाणार आहे.
- देशांतर्गत बॉक्सिंग हंगामाला आजपासून सुरूवात
युवा व कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसह देशांतर्गत बॉक्सिंग हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रीय युवा पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धा १८ ते २३ जुलै या कालवधीत पार पडणार आहेत. तर राष्ट्रीय कनिष्ठ मुले व मुली गटाच्या स्पर्धा २६ ते ३१ जुलै या दरम्यान होणार आहेत.