ETV Bharat / bharat

New Year Rules Changes 2023 : आजपासुन बदलणार आहेत 'हे' नियम..., जाणुन घ्या काय होणार बदल

author img

By

Published : Dec 31, 2022, 1:24 PM IST

Updated : Jan 1, 2023, 11:21 AM IST

1 जानेवारीपासून (New Year 2023) नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. यासोबतच अनेक नियम देखील बदलणार (Rules Changes) आहेत. नेमके कोणते आहेत 'हे' बदलणारे नियम ते जाणुन घेऊया. अन्यथा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपला आर्थिक बजेट गडबडणार. New Year Rules Changes 2023

New Year Rules Changes 2023
नवीन वर्षात बदलतील हे नियम

१ जानेवारी २०२३ (New Year 2023) पासून म्हणजे आजपासून तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार आहेत आणि या बदलांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे बदल थेट तुमच्या खिशावरही परिणाम (Rules Changes) करू शकतात. हे बदल क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, स्वयंपाकाचा गॅस, ऑटोमोबाईल इत्यादी क्षेत्रात होणार आहेत. एवढेच नाहीतर जर का तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तरी देखील 2022 मध्ये तुम्ही ठरविलेल्या बजेट पेक्षा तो बजेट 2023 मध्ये काही पटीने नक्की वाढणार आहे. New Year Rules Changes 2023

तर बँक जबाबदार : बँकांमध्ये महागड्या वस्तु ठेवण्याबाबत आरपीआयच्या वतीने नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यानुसार बँकांना यापुढे ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही. नव्या नियमानुसार बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाले, तर त्यासाठी बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी बँका ग्राहकांशी करारही करत आहेत. 31 डिसेंबर 2022 पर्यंत बँक आणि ग्राहकांमध्ये नवीन करार होईल.

क्रेडिट कार्डमध्ये बदल : 1 जानेवारीपासून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होत आहेत. त्यानुसार, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल होईल, त्यामुळे क्रेडिट कार्डमधील उर्वरित रिवॉर्ड पॉइंट ३१ डिसेंबरपूर्वी वापरा.

पेट्रोल-डिझेल,गॅसच्या किमती : 31 डिसेंबरला पेट्रोल डिझेलच्या किमतीचे मूल्यमापन तेल कंपन्या करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन किमती १ जानेवारीपासून लागू होतील. यासोबतच स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीतही बदल होणार आहे.

वाहनांच्या किमती : नववर्षात अनेक जन नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखतात आपण पण अशी याेजना आखत असाल तर थोडे थांबा कारण जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर, १ जानेवारीपासून कार कंपन्यांकडून दरवाढीचे संकेत मिळत आहेत. कार सोबतच दुचाकींच्या किमतीही वाढू शकतात. असे सांगितले जात आहे.

5. जीएसटी नियमांत बदल : काही वर्षांपासून प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारात जीएसटीचा समावेश झालेला आहे. १ जानेवारीपासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. या अंतर्गत, जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी आवश्यक असलेली थ्रेशोल्ड मर्यादा 20 कोटींवरून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे.

6. सिमेंटच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता : सिमेंट कंपन्या १ जानेवारीपासून सिमेंटच्या दरात २० रुपयांनी वाढ करण्याच्या तयारीत आहेत. कंपन्यांनी डीलर्सनाही तशा सूचना दिल्या आहेत. यासोबतच काही बिल्डर्स कंपन्यांकडून प्रकल्पाच्या किमतीतही वाढ करण्यात येणार आहे. New Year Rules Changes 2023

Last Updated : Jan 1, 2023, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.