ETV Bharat / bharat

Share Market Update: जागतिक बाजारात नकारात्मक कल; भारतीय बाजारात मात्र तेजी - Bombay Stock exchange

एकीकडे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक कल असताना आयटी, धातू आणि ऊर्जा समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी (equity benchmark index) बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात तेजी आणली.

Share Market Update
Share Market Update
author img

By

Published : Oct 12, 2022, 11:49 AM IST

मुंबई: जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक कल असताना आयटी, धातू आणि ऊर्जा समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी (equity benchmark index) बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात तेजी आणली. मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरण झाल्यानंतर, 30 शेअर्सचा बीएसई बेंचमार्क (BSE benchmark) 179.53 अंकांनी वाढून 57,326.85 वर पोहोचला. एनएसईचा निफ्टी (NSE NIFTY) 52.75 अंकांनी वाढून 17,036.30 वर पोहोचला.

३० शेअर्सच्या सेन्सेक्स पॅकमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, विप्रो, सन फार्मा, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. दुसरीकडे एशियन पेंट्स आणि भारती एअरटेलचे शेअर्स घसरले. आशियात इतरत्र सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजार तोट्याने व्यवहार करत होते.

मंगळवारी बीएसई बेंचमार्क 843.79 अंकांनी म्हणजेच 1.46 टक्क्यांनी घसरून 57,147.32 वर स्थिरावला होता. निफ्टी 257.45 अंकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी घसरून 16,983.55 वर बंद झाला. तर अमेरिकन बाजार संमिश्र प्रतिसादावर बंद झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.64 टक्क्यांनी घसरून USD 93.70 प्रति बॅरल झाले. बीएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 4,612.67 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.