कोल्लम (केरळ): केरळमधील एका शैक्षणिक संस्थेत आयोजित NEET परीक्षेच्या ड्युटीवर असलेल्या पाच महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली ( Five arrested forcing girl students remove innerwear ) आहे. रविवारी झालेल्या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थिनींना त्यांचे अंतर्वस्र काढण्यास लावल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली ( NEET kerala frisking row ) आहे.
मेटल डिटेक्टरने केली तपासणी : पहिली आणि दुसरी आरोपी महिला या घटना घडलेल्या आयुर येथील मार्थोमा कॉलेजचे कर्मचारी आहेत. दोघांचेही नाव मरियम्मा आहे. तिसरी आरोपी गीतू, चौथी आरोपी वीणा आणि पाचवी आरोपी ज्योत्सना एनटीएने नियुक्त केलेल्या एजन्सीसाठी काम करत आहेत. त्यांनीच मेटल डिटेक्टर वापरून तपासणी केली.
विद्यार्थिनींना अत्यंत वाईट वागणूक : या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तासभर चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, कॉलेजच्या महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना कपडे काढण्यासाठी नेले. कॉलेजच्या या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे विद्यार्थिनींनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, महाविद्यालयाने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. केवळ परीक्षा आयोजित करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्याची माहितीही महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आणखीही काही जणांना अटक होणार : पोलिसांनी सांगितले की, कॉलेजच्या कर्मचार्यांनी या घटनेमुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना, कपडे किंवा परीक्षा मोठी आहे का, अशी विचारणा केली. मात्र, NEET परीक्षेच्या वादात अंतर्वस्र काढण्याच्या घटनेत आणखी अटक होणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.