ETV Bharat / bharat

माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे देशाचे स्वप्न पूर्ण झाले, नीरज चोप्राच्या वडिलांची प्रतिक्रिया

माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे देशाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. याचा मला आनंद वाटत आहे, अशी प्रतिक्रिया नीरजच्या वडिलांनी दिली.

Olympic gold medalist Neeraj Chopra
Olympic gold medalist Neeraj Chopra
author img

By

Published : Aug 7, 2021, 7:53 PM IST

पानीपत (हरयाणा) - भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अॅथलेटिक्समध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळून दिले आहे. नीरजच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या वडिलांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे देशाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. याचा मला आनंद वाटत आहे, अशी प्रतिक्रिया नीरजच्या वडिलांनी दिली.

हेही वाचा - Tokyo Olympics : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! नीरज चोप्राने इतिहास रचला, टोकियोत जिंकलं सुवर्ण पदक

नीरज्या प्रशिक्षणाची पातळी पाहिल्यानंतर त्याला हे पदक मिळेल अशी आम्हाला खात्री होती, असेही नीरजचे वडील म्हणाले. नीरज हा ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याचबरोबर, 2008 नंतर, म्हणजेच 13 वर्षांनंतर भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिकण्याचा पराक्रम केला आहे. 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाची संख्या 7 इतकी झाली झाली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्य पदक आहेत.

हेही वाचा - राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशभरातून नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.