ETV Bharat / bharat

उत्तराखंड : उशीराने उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ - उत्तराखंड कोरोना अपडेट

उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. रुग्णालयात भरती झाल्यानंतर 48 तासांच्या आत जवळपास 50 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड कोरोना अपडेट
uttarakhand corona update
author img

By

Published : May 13, 2021, 7:23 PM IST

डेहराडून - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. रुग्णालयात भरती झाल्यानंतर 48 तासांच्या आत जवळपास 50 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना डेथ ऑडिट कमेटीचे अध्यक्ष हेमचंद्र यांनी ही माहिती दिली आहे.

Nearly 50% COVID19 deaths in Uttarakhand took place within 48 hours
उत्तराखंडमध्ये मृत्यूच्या संख्येत वाढ

कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे मृत्यमागे कारण आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार होत नाहीत. रुग्णालयात उशीराने दाखल होणे, हे मृत्यूमागे मुख्य कारण असल्याचे हेमचंद्र यांनी सांगितले.

रुग्णांचा वाढता आलेख -

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात 3,62,727 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याखेरीज गेल्या 24 तासांत 4,120 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्बंध लागू करण्यात आले असूनही नियमांचे पालन होत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

हेही वाचा - 'कोरोना एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.