ETV Bharat / bharat

Jagdeep Dhankhar For VP : जगदीप धनखर हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा - Jagdeep Dhankhar Political Career

भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर ( NDA Candidate For VP Jagdeep Dhankhar ) असतील, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP chief JP Nadda ) यांनी केली आहे.

BJP Meeting
भाजप बैठक
author img

By

Published : Jul 16, 2022, 8:08 PM IST

Updated : Jul 16, 2022, 10:48 PM IST

नवी दिल्ली : देशात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र झाली आहे. या अनुषंगाने आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यात भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर ( NDA Candidate For VP Jagdeep Dhankhar ) असतील, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP chief JP Nadda ) यांनी केली आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा भाजप मुख्यालयात उपस्थित होते. त्याचबरोबर पक्षाचे प्रादेशिक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले होते.

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत अनेक नावांची चर्चा सुरू होती. देशात राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेवर सट्टा लावल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी अल्पसंख्याक चेहरा उतरवला जाऊ शकतो, असेही सांगण्यात येत होते. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखर यांचे नाव अंतिम करण्यात आले.

कोण आहेत जगदीप धनखर ? ( Who is Jagdeep Dhankhar )

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार असतील. पक्षाच्या मुख्यालयात पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखर यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले. धनखर आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जुलै 2019 मध्ये राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच वाद सुरू आहेत. त्यांनी राज्य सरकारवर "अति तुष्टीकरण, जातीय संरक्षण आणि माफिया सिंडिकेट खंडणी" असा आरोप केला आहे.

चित्तौडगडच्या सैनिक शाळेतून प्राथमिक शिक्षण ( Jagdeep Dhankhar Education ) : १८ मे १९५१ रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील दुर्गम गावात किथाना (आदिवासी क्षेत्र) येथे जन्मलेले धनखर, गोकुलचंद धनखर यांच्या खेडेगावात जन्मले. त्यांनी शिक्षणानंतर गर्धना येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. गावातून इयत्ता पाचवीपर्यंत.. त्यानंतर चित्तोडगडच्या सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. जाट समाजातील, धनखर यांनी भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. ज्या कुटुंबात पूर्वी वकील नव्हते, तिथे त्यांनी वकिलीत खूप नाव कमावले. 1977 पासून त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1986 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी धनखर राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले. ते बार कौन्सिलचे सदस्यही राहिले आहेत. धनखर यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.

झुंझुनू येथून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले ( Jagdeep Dhankhar Political Career ) : 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ते जनता दलाचे उमेदवार म्हणून झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी 1990 मध्ये व्हीपी सिंह यांच्या सरकारमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 1991 मध्ये त्यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1991 मध्ये, त्यांनी अजमेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, परंतु भाजपच्या रसासिंग रावत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 1993 मध्ये धनखर अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेवर निवडून आले. वसुंधरा राजे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर 2003 मध्ये त्यांचा काँग्रेसमधील भ्रमनिरास झाला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा आणि राजस्थान विधानसभेतील महत्त्वाच्या समित्यांचा ते भाग होते. ते राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्षही होते. नंतर जुलै 2019 मध्ये त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

ममता यांच्याशी नेहमीच वाद होते : पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यापासून ते ममता यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे चर्चेत आहेत. बंगाल निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या राजकीय हिंसाचारासाठी धनखर यांनी थेट ममता सरकारला जबाबदार धरले होते. धनखर यांनी भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याबद्दल राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधला होता आणि ते म्हणाले होते की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे की त्यांची कार्यशैली अशी आहे की माझ्यावर जबरदस्ती केली जात आहे. मला आशा आहे की ती संविधानाचा आत्मा समजून घेईल आणि योग्य मार्गावर येईल. मला आशा आहे की त्यांचे सरकार याला प्रथम प्राधान्य देईल आणि माझ्यावर जबरदस्ती करणार नाही. धनखर यांचा ममता यांच्याशी इतका संघर्ष झाला की टीएमसीने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची शिफारसही केली होती. उल्लेखनीय आहे की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून, ६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

Last Updated : Jul 16, 2022, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.