ETV Bharat / bharat

पुद्देचेरी सरकारने फक्त गांधी कुटुंबाची सेवा केली - आमित शाह - आमित शाह पुद्दुचेरी दौऱ्यावर

गृहमंत्री आमित शाह पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज कराईकल येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्राने 15 हजार कोटी रुपये पुद्दुचेरीच्या विकासासाठी दिले. मात्र, नारायणसामी सरकारने ते पैसे गांधी कुटुंबाच्या सेवेसाठी दिल्लीत पाठवून दिले, अशी टीका शाह यांनी केली.

Amit Shah
आमित शाह
author img

By

Published : Feb 28, 2021, 5:11 PM IST

पुद्दुचेरी - देशात केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. गृहमंत्री आमित शाह पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज कराईकल येथे सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्राने 15 हजार कोटी रुपये पुद्दुचेरीच्या विकासासाठी दिले. मात्र, नारायणसामी सरकारने ते पैसे गांधी कुटुंबाच्या सेवेसाठी दिल्लीत पाठवून दिले, अशी टीका शाह यांनी केली.

लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असतात. या निवडणुका घ्याव्यात की नाही?, परंतु हायकोर्टाने निकाल दिल्यानंतही गेली 14 वर्षे पुद्दुचेरीमध्ये निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. कारण निवडणुका घेतल्यास येथे भाजपा सत्तेत येईल, अशी भीती त्यांना होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने लागलीत. भाजपाच्या नेतृत्वात एनडीए सरकार पुद्दुचेरीत स्थापन होणार, असे शाह म्हणाले.

केवळ पुद्दुचेरीत नाही. तर देशभरात अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये सामील होत आहेत. कारण, काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान नाही. भाजपाने त्यांचे सरकार पाडले असल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे. मात्र, भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचे सरकार पडले आहे. खोटे बोलणाऱ्या व्यक्तींला तुम्ही मुख्यमंत्री केले आहे. त्यांनी फक्त गांधी कुटुंबाची सेवा करण्यात लक्ष्य दिले. काँग्रेस पक्ष केवळ पुद्दुचेरीमध्येच नव्हे. तर देशभरामध्ये वंशावादामुळे विखुरलेला आहे, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्रालय नाही, असा दावा केला होता. मात्र, 2019 मध्ये मत्स्यव्यवसाय विभाग स्थापन करण्यात आला आहे. मात्र, त्यांना तो माहित नाही. मत्स्यपालनाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या उणीवा दूर करण्यासाठी मोदी सरकारने 20 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. याचा पुद्दुचेरीला सर्वाधिक फायदा होणार आहे, असे शाह म्हणाले.

पुद्दुचेरीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी उडान योजनेअंतर्गत पुद्दुचेरीला बंगळूर आणि हैदराबादशी जोडले गेले आहे. 25 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका छोट्या बंदराचे भूमिपूजन केले. यामुळे समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या विकासासाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे. हे बंदर 2009 पासून बंद होते. जे लवकरच सुरू होईल. पुद्दुचेरीला सर्वोत्कृष्ट बनविण्याचे मोदींचे लक्ष्य आहे, असेही शाह म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.