ETV Bharat / bharat

NDA Meeting in Delhi  : देशातील 26 विरोधी पक्षाचा एनडीएच्या 38 पक्षांसोबत 'सामना', एनडीएची  दिल्लीत आज बैठक

author img

By

Published : Jul 18, 2023, 12:23 PM IST

Updated : Jul 18, 2023, 12:54 PM IST

विरोधी पक्षाच्या वतीने बंगळुरूत आज बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत देशभरातील तब्बल 26 पक्ष एकवटले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 38 पक्षाचा सहभाग असणार असल्याची माहिती भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली आहे.

Lok Sabha Polls 2024
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी देशातील तब्बल 26 पक्ष एकवटले आहेत. आज विरोधी पक्षांची बंगळुरूत बैठक होत आहे. मात्र विरोधी पक्षातील 26 पक्षांचा एनडीएतील 38 पक्षांसोबत 'सामना' रंगणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याबाबतची चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. राज्य पातळीवर विखुरलेले प्रादेशिक पक्ष आता भाजपकडे वळले आहेत. भाजपचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज एनडीएचे 38 पक्ष दिल्लीतील बैठकीत एकत्र येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्षाची बंगळुरूत बैठक होत असताना एनडीएची आज दिल्लीत बैठक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक : राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) नेते चिराग पासवान एनडीएमध्ये सामील झाले. 'दिल्लीत चिराग पासवानला भेटलो. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो, असे ट्विट भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता 38 पक्ष : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता 38 पक्ष असल्याचे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्पष्ट केले आहे. आज दिल्लीत एनडीएची बैठक होणार आहे, तर विरोधी पक्षांची मुख्य परिषद याच दिवशी बंगळुरूमध्ये होणार आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांमध्ये एआयएडीएमके, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी, मेघालय), एनडीपी (नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी), एसकेएम (सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा) जेजेपी (जननायक जनता पार्टी), एजेएसयू (ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन), आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), एमएनएफ (मिझो नॅशनल फ्रंट), टीएमसी (तमिळ मनिला काँग्रेस), आयपीएफटी (इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा), बीपीपी (बोडो). ) पीपल्स पार्टी), पीएमके (पट्टाली मक्कल काची), एमजीपी (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी), अपना दल, एजीपी (आसाम गण परिषद), राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीपीएल (युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, आसाम), एआयआरएनसी (आसाम) ऑल इंडिया एनआर काँग्रेस, पुद्दुचेरी), शिरोमणी अकाली दल (संयुक्त, दधियाल), जनसेना (पवन कल्याण), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान), एचएएम (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) , राष्ट्रीय लोक समता पार्टी, विकासशील इन्सान पार्टी, ( मुकेश साहनी ) आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ( ओम प्रकाश राजभर) देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधी पक्षाची बंगळुरूत बैठक : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांनी पाटणा येथे बैठक घेऊन एकत्र येण्याविषयी मोट बांधली आहे. त्यानंतर सोमवारी बैठकीसाठी बंगळुरूमध्ये विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या बैठका होत आहेत. मात्र एनडीएची बैठक राष्ट्रीय आपत्ती आघाडी असल्याची टीका काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याच्या उद्देशाने एकत्र येण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. बंगळुरूत भ्रष्ट पक्षांचा मेळावा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा -

  1. Opposition Meeting in Bengaluru : विरोधी पक्षांच्या बैठकीत आज 'या' सहा महत्वाच्या मुद्द्यांवर होणार खल; भाजपविरोधात काय होणार एकमत?
  2. Opposition Meeting in Bengaluru : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या बैठकीला राहणार हजर

Last Updated : Jul 18, 2023, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.