ETV Bharat / bharat

NDA Meeting in Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग- प्रफुल्ल पटेल - Eknath Shinde in NDA Meeting

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल दिल्लीत एनडीएची बैठक झाल्यानंतर मुंबईला रवाना झाले. मंगळवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 38 पक्ष हजर होते. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी भविष्यात एनडीएसोबत काम करेल.

NDA Meeting
एनडीए बैठक
author img

By

Published : Jul 19, 2023, 8:49 AM IST

Updated : Jul 19, 2023, 9:01 AM IST

एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल मुंबईला निघाले

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाले. भारतीय जनता पक्षाने 18 जुलै रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 38 पक्षांची बैठक घेतली होती. एनडीएच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे व अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना झाले होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी पाटणा येथे गेल्या महिन्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित होते. ते मंगळवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग आहे. त्यांचा पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल, असे ते म्हणाले. एनडीएच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 38 राजकीय पक्ष उपस्थित होते. आमच्या बाजूने अजित पवार यांनी बैठकीत आपले विचार मांडले, असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

एनडीएची दिल्लीत बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी देशातील तब्बल 26 पक्ष एकवटल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांची नुकतीच बंगळुरूमध्ये बैठक पार पडली आहे. आता विरोधी पक्षातील 26 पक्षांचा एनडीएतील 38 पक्षांसोबत 'सामना' रंगणार असल्याचे चित्र आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एनडीएचे 38 पक्ष दिल्लीतील बैठकीत एकत्र येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्षाची बंगळुरूत बैठक दुसरीकडे एनडीएची दिल्लीत बैठक झाली होती.

हेही वाचा :

  1. NDA Vs INDIA : ना इकडे ना तिकडे; देशातील 'हे' पक्ष अद्याप तटस्थ
  2. NDA Meeting : NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवारांना पहिल्या रांगेत स्थान, मोदींनी सांगितला NDA चा नवा अर्थ
  3. INDIA VS NDA : विरोधी आघाडीत मतभेद, तर एनडीएतही कुरबुरी; कोणाचे किती बलाबल?

Last Updated : Jul 19, 2023, 9:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.