ETV Bharat / bharat

BJP Leader Murdered: भाजप नेत्याची निर्घृण हत्या.. घरात घुसून नक्षलवाद्यांनी घातल्या गोळ्या..

author img

By

Published : Feb 11, 2023, 3:42 PM IST

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सागर साहू यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. पाच दिवसांपूर्वी विजापूरमध्येही नक्षलवाद्यांनी भाजपच्या एका नेत्याची हत्या केली होती. एकामागून एक होत असलेल्या हत्यांवरून भारतीय जनता पक्षाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Maoists kill politicians in Chhattisgarh
भाजप नेत्याची निर्घृण हत्या.. घरात घुसून नक्षलवाद्यांनी घातल्या गोळ्या..

रायपूर/हैदराबाद: भाजपचे जिल्हाध्यक्ष सागर साहू यांच्या लहाने डोंगर येथील घरात शुक्रवारी रात्री सुमारे 4 ते 5 नक्षलवादी घुसले. सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेल्या सागर साहू यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. आठवडाभरात नक्षलवाद्यांकडून हत्येची ही दुसरी घटना होती. प्रशासनाकडून आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा केला जात असतानाच, भाजपकडून मात्र आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. जाणून घेऊयात छत्तीसगडमध्ये यापूर्वी नक्षलवाद्यांनी कोणत्या नेत्यांवर केला आहे हल्ला..

नीळकंठ काकेम: भाजप नेते नीलकंठ काकेम हे ५ फेब्रुवारीच्या रात्री नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबासह गेले होते. तेथे अचानक आलेल्या नक्षलवाद्यांनी भाजप नेते नीलकंठ काकेम यांच्यावर कुऱ्हाडीने आणि चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी पत्रक फेकून या हत्येची जबाबदारी घेतली आहे. काकेम हे अवपल्ली मंडळाचे १५ वर्षे भाजपचे अध्यक्ष होते. त्यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली होती.

भीमा मांडवी, नंदकुमार पटेल: दंतेवाडा येथील भाजप आमदार भीमा मांडवी यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून जिल्हा मुख्यालयात परतत असताना 9 एप्रिल 2019 रोजी हत्या करण्यात आली. नक्षलवाद्यांनी श्यामगिरी गावाजवळ आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) पेरून त्याच्या ताफ्याला उडवून दिले. या हल्ल्यात आमदार भीमा मांडवी, त्यांचा चालक, सुरक्षा रक्षक यांच्यासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला होता.

महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल आणि विद्या चरण शुक्ला: छत्तीसगड काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा 2004 ते 2008 या काळात छत्तीसगड विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2005 मध्ये त्यांनी छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांविरोधातील सलवा जुडूम आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 25 मे 2013 रोजी सुकमा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीतून परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांच्यासह २७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विद्या चरण शुक्ला यांच्यासह ३१ जण जखमी झाले होते. बाल येथे उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या विद्या चरण यांचेही निधन झाले. 27 मे रोजी, नक्षलवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक निवेदन जारी केले, "सलवा जुडूम आणि निमलष्करी दलाच्या तैनातीच्या निषेधार्थ त्यांनी ही घटना घडवून आणली होती.

हेही वाचा: Naxalites killed BJP leader: नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या.. घरच्यांसमोर कुऱ्हाडीने केले वार.. छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.