बीजापूर (छत्तीसगड) - बीजापूर येथील पामेडच्या धर्मारम परिसरातील पोलीस कँपवर नक्षल्यांनी हल्ला केला. हा हल्ला रात्र 8 वाजता झाला आहे. या हल्ल्या नक्षल्यांनी कँपवर बैरल ग्रेनेड लॉन्चर ( Barrel Grenade Launcher ) चा वापर केला. सुमारे 15 ते 20 मिनटे गोळीबार सुरू होता. सुरक्षा दलाच्या जवानांनीही नक्षल्यांवर गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिला. सुरक्षा दलाच्या जोरदार गोळीबारानंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले.
एरिया डोमिनेशन टीम पर भी हुआ नक्सली हमला - चिंतावगु कॅपहून सुरक्षा दलाचे जवान गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जंगलात सुरक्षा रक्षकाचे जवान व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी नक्षल्याने सुमारे 6 ते 7 वेळा बैरल ग्रेनेड लॉन्चरने हल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. अंधााराचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. नक्षल्यांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - LeT Top Commander Killed : पुलवामा चकमकीत लष्करच्या टॉप कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा