रायपूर : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा बॉम्बने एक बस उडवली. या बसमधून डीआरजी जवान प्रवास करत होते. या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले असून ८ पेक्षा जास्त जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घटनेनंतर जवानांची तुकडी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. तर, छत्तीगडच्या राज्यपाल अनुसुइया उइके यांनी शोक व्यक्त केला आहे.
जखमी जवानांवर उपचार सुरू -
या घटनेतील जखमी जवानांना घौडाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना नारायणपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसवर हल्ला झाला तेव्हा बसमध्ये ३० जवान होते. नक्षल्यांनी बस घौडाई आणि पल्लीनारच्या मध्ये असताना बसवर हल्ला केला. घटनेनंतर नक्षल्यांना शोधण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे.