नवी दिल्ली : तपस यूएव्ही (TAPAS UAV) भारतीय नौदल तळावरून उड्डाण केल्यानंतर यशस्वी आणि सुरक्षित परतले आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या तपस यूएव्हीची निर्मिती डीआरडीओने (DRDO) केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरू येथे झालेल्या एरो इंडिया शोमध्ये तपस यूएव्ही ड्रोनचे प्रदर्शन करण्यात आले होते.
अमेरिकेकडून 31 ड्रोन खरेदी करण्यास मान्यता : पंतप्रधान मोदींनी या ड्रोनचे कौतुक केले होते. रविवारी डीआरडीओने भारतीय नौदलाच्या सहकार्याने INS सुभद्रावरील रिमोट ग्राउंड स्टेशनवरून तपस यूएव्हीच्या कमांड आणि कंट्रोल क्षमतांचे हस्तांतरण यशस्वीरित्या दाखविले आहे. तपस यूएव्ही चे हे प्रात्यक्षिक अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून 31 हाय अल्टिट्यूड लॉन्ग इंड्यूरन्स प्रेडेटर (High Altitude Long Endurance Predator) ड्रोन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे : या संदर्भात माहिती देताना डीआरडीओने सांगितले की, कारवार नौदल तळापासून 285 किमी अंतरावर असलेल्या चित्रदुर्गाच्या एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR) येथून तपसने 07.35 वाजता उड्डाण केले. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित या यूएव्ही चे नियंत्रण करण्यासाठी INS सुभद्रा येथे एक ग्राउंड कंट्रोल स्टेशन (GCS) आणि दोन शिप डेटा टर्मिनल्स (SDT) स्थापन करण्यात आले. चाचणीनंतर, तपस अचूकतेने एटीआरमध्ये परत आले.
ड्रोन विकसित करण्याचे उद्दिष्ट : तपस हे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित मेल क्लास ड्रोन आहे. भारताचे ड्रोन विकसित करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट हे आहे की कोणत्याही संघर्षाच्या प्रसंगी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी भारताला देशांतर्गत तयार केलेले ड्रोन हवे आहेत. या वर्षीच्या एरो इंडिया शोमध्ये तपस ड्रोनचे प्रदर्शन करण्यात आले. TAPAS चे पूर्ण नाव Tactical Airborne Platform for Aerial Surveillance असे आहे.
तपस ड्रोनचे वैशिष्ट्य : तपस ड्रोनचा वापर केवळ सीमांवर लक्ष ठेवण्यासाठीच नाही तर शत्रूंवर हल्ला करण्यासाठीही केला जाऊ शकतो. तपस ड्रोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ते 28 हजार फूट उंचीवर 18 तासांपेक्षा जास्त काळ उडू शकते. तपस हे मध्यम उंचीचे दीर्घ- सहनशील ड्रोन आहे. तपस हे असे ड्रोन आहे ज्यात स्वत:हून टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता आहे.
हेही वाचा :