ETV Bharat / bharat

Navratri 2023 Day 8 : दुर्गाष्टमीला करा महागौरीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग - शारदीय नवरात्री

Navratri 2023 Day 8 : शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरी देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी मुलींची पूजा करण्याचा विधीही शास्त्रात वर्णन केलेला आहे. महागौरीची पूजा केल्यानं सर्व पापं नष्ट होतात.

Navratri 2023 Day 8
देवी महागौरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:00 AM IST

हैदराबाद : शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीचं आठवं रूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच आज मुलीची पूजा करणं शुभ मानलं जातं. नवरात्रीची अष्टमी तिथी दुर्गाष्टमी म्हणूनही ओळखली जाते. आजच्या दिवशी देवी महागौरीची पूजा केल्यानं सुख-समृद्धी येते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. चला जाणून घेऊया मातेची पूजा कशी करावी आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे.

देवी महागौरीचं स्वरूप : देवी दुर्गेच्या आठव्या सिद्ध रूपात देवी महागौरी आहे. देवी महागौरी आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकण्यासाठी म्हशीवर स्वार होऊन येते. देवीला चार हात असून प्रत्येक हातामध्ये मातेनं अभय मुद्रा, त्रिशूल, डमरू आणि वर मुद्रा धारण केली आहे.

देवी महागौरी पूजन पद्धत : नवरात्रौत्सवाच्या अष्टमी तिथीला स्नान करावं, ब्राह्ममुहूर्तावर ध्यान करावं व पूजास्थान स्वच्छ करावं. यानंतर पूजास्थानाला गंगाजलानं ओलावा. असं केल्यावर व्रताची प्रतिज्ञा करून सिंदूर, कुंकुम, लवंग, वेलची आणि लाल चुनरी मातेला अर्पण करा. हे केल्यानंतर देवी महागौरी आणि दुर्गा यांची यथायोग्य आरती करावी. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा. शास्त्रानुसार या दिवशी नऊ मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी 10 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या नऊ मुली आणि एक बटूक आपल्या घरी आमंत्रित करा. नंतर पुरी-साब्जी किंवा खीर-पुरी भक्तिभावानं अर्पण करा. असं केल्यानं आई प्रसन्न होते.

नवरात्रीचा आठवा दिवस - (जांभळा) : 22 ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते. हा रंग नवचैतन्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात या रंगाला खूप महत्व आहे. जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत होते.

हेही वाचा :

  1. Navratri 2023 : जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणते मसाले वापरले जाऊ शकतात...
  2. Navratri 2023 : कुऱ्हा येथे 'या' दोन्ही मंदिरात होतो खास नवरात्रौत्सव; जाणून घ्या मंदिरांचं आगळंवेगळं महत्त्व...
  3. Navratri 2023 Day 7 : देवी कालरात्रीच्या पूजेनं मिळते आसुरी प्रभावापासून मुक्ती; जाणून घ्या उपासनेची पद्धत आणि रंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.