हैदराबाद : Navratri 2023 Day 5 अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला येणारा दिवस हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गा माता स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेची यथायोग्य पूजा केल्याने सुख-समृद्धी तसेच अपत्यप्राप्ती होते, असे मानले जाते. जाणून घ्या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा कशी करायची, तसेच जाणून घ्या काय आहे पाचव्या दिवसाचा रंग.
कसे आहे आई स्कंदमातेचे रूप : स्कंदमातेचे स्वरूप खूपच सुंदर आहे. स्कंदमाता, देवी दुर्गेचे रूप, तिला चार हात आहेत, दोन हातात कमळ आहे, एका हातात कार्तिकेय बालस्वरूपात बसलेला आहे आणि दुसऱ्या हातात माता आशीर्वाद देताना दिसत आहे. आईचे वाहन सिंह आहे, परंतु या रूपात ती कमळात विराजमान आहे.
स्कंदमातेची पूजा पद्धत : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी दुर्गेची पूजा करण्यापूर्वी कलशाची पूजा करा. यानंतर देवी दुर्गा आणि तिच्या रूपाची पूजा सुरू करा. सर्व प्रथम पाण्याने स्नान करावे. यानंतर देवीला फुले, हार अर्पण करा. यानंतर सिंदूर, कुंकुम, अक्षत इत्यादी लावा. नंतर एका पानात सुपारी, वेलची, बताशा आणि लवंग टाकून अर्पण करा. यानंतर आई स्कंदमातेला केळी, फळे आणि मिठाई अर्पण करा. यानंतर पाणी द्यावे. यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून मातेच्या मंत्राचा जप करावा. यानंतर दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ करा आणि शेवटी देवी दुर्गासोबत स्कंदमाता आरती करा.
आई स्कंदमातेची अनेक नावे : कार्तिकेयाला देवांचा कुमार सेनापती असेही म्हणतात. कार्तिकेयाला पुराणात सनत-कुमार, स्कंद कुमार इत्यादी नावांनीही ओळखले जाते. या रूपात आई सिंहावर स्वार होऊन अत्याचारी राक्षसांना मारते. पर्वतराजाची कन्या असल्याने तिला पार्वती असेही म्हणतात आणि भगवान शिवाची पत्नी असल्याने तिचे नावही माहेश्वरी आहे. तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला गौरी असेही म्हणतात. आई आपल्या मुलावर जास्त प्रेम करते, म्हणून तिला स्कंदमाता म्हणतात जी आपल्या मुलावर खूप प्रेम करते. माता देवी अभय मुद्रेत कमळाच्या फुलावर विराजमान आहे, म्हणून तिला पद्मासन देवी आणि विद्यावाहिनी दुर्गा असेही म्हणतात.
नवरात्रीचा पाचवा दिवस - (पिवळा) : 19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणं खूप शुभ राहील. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं नवरात्रोत्सवात मन आशावादी आणि आनंदी राहते. हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.
हेही वाचा :
- Navratri 2023 Day 4 : शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते कुष्मांडा देवीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग
- Navratri 2023 Day 3 : नवरात्रीच्या तिसर्या दिवशी होणार चंद्रघंटा देवीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धती आणि रंग
- Navratri 2023 Day 2 : नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'ब्रह्मचारिणी' देवीची केली जाते पूजा; जाणून घ्या काय आहे आजचा रंग