ETV Bharat / bharat

Navratri 2021 : 5 कोटींच्या नोटांनी सजवले नेल्लोर येथील दुर्गादेवी मंदिर - Temple of Goddess Durga decorated with notes

नेल्लोर शहरातील स्टोन हाऊस पेटा येथे वसवी कन्याकपरामेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे 5 कोटीच्या चलनी नोटांनी सजलेले आहे. शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी नोटांच्या गठ्ठ्यांनी मंदिर सजवले आहे. कन्याकपरामेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Navratri 2021 : Durgadevi temple at nellore is decorated with Rs. 5.16 crore currency
Navratri 2021 : 5 कोटींच्या नोटांनी सजवले नेल्लोर येथील दुर्गादेवी मंदिर
author img

By

Published : Oct 11, 2021, 9:22 PM IST

Updated : Oct 11, 2021, 10:55 PM IST

नेल्लोर (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील श्री वसवी कन्याकपरामेश्वरी मंदिरात दरवर्षी दसरा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. मंदिराला कमिटी सदस्यांनी 5.16 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी सजवले होते. 2000, 500, 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नव्या चलनी नोटांसह 7 किलो सोने आणि 60 किलो चांदीने कन्याकापरमेश्वरी मंदिर सजवण्यात आले आहे.

Navratri 2021 : 5 कोटींच्या नोटांनी सजवले नेल्लोर येथील दुर्गादेवी मंदिर

मंदिर 5 कोटीच्या चलनी नोटांनी सजलेले -

नेल्लोर शहरातील स्टोन हाऊस पेटा येथे वसवी कन्याकपरामेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे 5 कोटीच्या चलनी नोटांनी सजलेले आहे. शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी नोटांच्या गठ्ठ्यांनी मंदिर सजवले आहे. कन्याकपरामेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष, NUDAचे अध्यक्ष मुक्कला द्वारकानाथ आणि प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी नवरात्रोत्सवास विशेष प्रार्थना केली.

भक्तांनी व्यक्त केल्या भावना -

मंदिर कमिटीने खूप चांगले विकसित केले गेले आहे. जसे आपण आपल्या लहानपणापासून ते पाहत आहोत. अतिशय चपखलपणे नवीन चलनी नोटांनी मंदिर सुशोभित केले होते. मंदिर समिती सदस्यांनी संपूर्ण मंदिर 5 कोटी रुपयांनी सजवले. मंदिराचे जीर्णोद्धारही आकर्षक पद्धतीने करण्यात आले आहे. भक्तांसाठी बनवलेल्या सर्व सुविधा पाहून आम्ही समाधानी आहेत असे येथे आलेल्या भक्तांनी सांगितले.

देवी सरनन्नावरथ्रू मंदिर 3 कोटींच्या नोटांनी सजवले -

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील निदामरू मंडळातील मंडलपारू गावातील श्री उमा नीलकंठेश्वर स्वामी पंचायत क्षेत्राची आई, धनलक्ष्मीच्या अवतारात देवी सरनन्नावरथ्रू प्रकट झाली होती. अशी आख्यायिका आहे. या मंदिरात देखील मंदिर समितीच्या सदस्यांनी, 3.05 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी मंदिराची सजावट केली. या सजावटीमध्ये विविध नाणी देखील वापरली गेली.

कनकदुर्गा मंदिर 10 लाख रुपयांच्या नोटांनी सजवले -

चेब्रोलू मंडळ, उंगुटुरु गावचे सरपंच रामधे लक्ष्मी सुनीता आणि राजाराव दाम्पत्यांनी दसरा उत्सवाचा भाग म्हणून कनकदुर्गा देवीला 10 लाख रुपयांच्या चलनी नोटांनी सजवले.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : पैसा, प्रसिद्धीपेक्षा आयुष्य कसं जगावं हे खेळ शिकवतो - विशेष कार्यक्रमात राही सरनोबतने मांडलं मत

Last Updated : Oct 11, 2021, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.