ETV Bharat / bharat

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची शायरीतून सरकारवर टीका

author img

By

Published : Feb 24, 2021, 7:11 PM IST

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शायराना अंदाजात टि्वट करून केंद्रावर टीका केली आहे.

नवज्योतसिंग सिद्धू
नवज्योतसिंग सिद्धू

चंदीगढ (पंजाब ) - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी ठाण मांडल्यापासून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू टि्वट करून केंद्रावर शायराना अंदाजात टीका करत आहेत. आज त्यांनी दोन टि्वट प्रसिद्ध करत केंद्रावर टीका केली आहे.

सरकार काळे कायद्यांची परंपराच चालवली आहे. ते तुम्हाला तुरूंगात भोजन देण्याची भाषा करत आहे(ये काले क़ानूनों की तहज़ीब है जनाब, ये क़ैद कर खाना देने की बात करते हैं), असे त्यांनी म्हटलं. तर दुसऱ्या एका टि्वटमध्ये त्यांनी गरज पडल्यास सर्व एकत्र येत आहेत. जसे, मुंगसाची सापासोबत मैत्री होत आहे (मतलब पड़ा तो सारे अनुबन्ध हो गये, नेवले के भी साँपों से सम्बन्ध हो गये), असे त्यांनी म्हटलं. यापूर्वीही त्यांनी अनेक टि्वट करून शायरीतून सरकारवर बाण सोडले आहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी जुलै 2019 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं होतं. कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील वाद टोकाला गेले होते. आता पंजाबमधील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सिद्धू पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांची भेट घेतली होती. शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबमध्ये नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.