हैदराबाद : दरवर्षी ४ मार्च हा दिवस भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत जागरूकता वाढवणे हा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता आठवडाभर साजरा केला जात आहे. यंदा ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जाणार आहे.
जागरूकता किंवा लक्ष न दिल्याने होणारे अपघात रोखणे हा राष्ट्रीय सुरक्षा दिन (National Security Day 2022 ) साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. पूर्वी साजरा होणारा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आता राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या सप्ताहात विविध जनजागृती कार्यक्रमांद्वारे लोकांना औद्योगिक अपघात रोखण्याच्या पद्धतींची माहिती करून दिली जाते. या संपूर्ण आठवड्यात केलेल्या प्रत्येक उपक्रमाचा एकमेव उद्देश लोकांना त्यांच्या सुरक्षेबद्दल जागरूक करणे हा आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद
नॅशनल सेफ्टी काऊंन्सिल ( National Safety Council ) ही 4 मार्च 1966 रोजी ना -नफा तोटा तत्वावर स्थापन केलेली सरकारी संस्था आहे. भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण (SHE) चळवळीचा विकास करण्यासाठी संस्था स्थापन केली. देशभरात विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केल्या जातात. ही संस्था समाजाला योग्य धोरणे, पद्धती आणि कार्यपद्धती अवलंबण्यासाठी स्थापन केली आहे. आजकाल सुरक्षा हा भारताचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण भारत हा एक मोठा देश आहे आणि क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा देश आहे. सण किंवा कार्यक्रमांच्या काळात, सर्व सुरक्षा दल लोकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. पोलीस, कमांडो या सुरक्षा दलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो.अपघात टाळण्याच्या मार्गांची माहिती देण्यासाठी दूरगामी कल्याणकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात.
हेही वाचा - AP Three Capital : तीन राजधान्या आणि सीआरडीए रद्द करण्याचा आंद्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा इतिहास
राष्ट्रीय सुरक्षा दिन प्रथमच 4 मार्च 1972 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या स्थापनेच्या दिवशी साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 4 मार्च 1965 रोजी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणावर स्वयंसेवी चळवळ निर्माण करण्यासाठी याची स्थापना केली. यासंबंधी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने पुढाकार घेतला होता. 1962 मध्ये झालेल्या 22 व्या कामगार मंत्र्यांच्या परिषदेत 'कारखान्यातील सुरक्षितता' या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली. अपघात प्रतिबंधक मोहिमेसाठी नॅशनल सेफ्टी काऊंसिल करण्याचाही विचार झालाय 1965 मध्ये 11 ते 13 डिसेंबर 1965 या कालावधीत दिल्लीतील कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार येथे 'औद्योगिक सुरक्षेवर अध्यक्षांची परिषद' आयोजित करण्यात आली. फेब्रुवारी 1966 मध्ये स्थायी कामगार समितीच्या 24 व्या अधिवेशनात राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) च्या स्थापनेशी संबंधित ठराव मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे, भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने 4 मार्च 1966 NSC ची स्थापना केली.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा विषय
दरवर्षी, नॅशनल सेफ्टी काऊन्सिल (NSC) राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरे करण्यासाठी नवीन थीम ठरवते. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा याचा मुख्य उ्द्देश आहे. आठवडाभर हा कार्यक्रम चोलतो. गेल्या वर्षीची थीम 'रस्ता सुरक्षा' होती.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा उद्देश
1: सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकसहभाग वाढवणे
2: जीवनाच्या सर्व क्षेत्रात सुरक्षिततेची मूल्ये आणि महत्त्व वाढवणे.
3: कामाच्या ठिकाणी सुरक्षित पद्धती लागू करणे, अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपायांना प्राधान्य देणे.
4: कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य आणि सामान्य जीवनशैलीला प्राधान्य देणे.
5: सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण चळवळ देशाच्या विविध भागात पसरवणे.
6: अधिकाधिक लोकांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे.
7: कर्मचार्यांच्या सहभागाचा उच्च दर सुनिश्चित करणे.
8: विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख खेळाडूंचा सहभाग मिळवण्यासाठी.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचा इतिहास
1: हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस देशाचे रक्षण करणारे पोलीस, कमांडो, रक्षक, सैन्य अधिकारी, निमलष्करी दल आणि सुरक्षेत सहभागी असलेल्या सर्व सुरक्षा दलांना समर्पित आहे.
2: भारताकडे जगातील तिसरी सर्वात मोठी लष्करी शक्ती असून, 1.3 दशलक्षाहून अधिक सुरक्षा बळ आहे.
3: 2013 च्या उत्तराखंड पूर दरम्यान केलेले 'ऑपरेशन राहत' जगातील सर्वात मोठ्या नागरी बचाव कार्यांपैकी एक होते.
4: राष्ट्रीय सुरक्षा परिषद (NSC) ही देशाच्या राजकीय, आर्थिक, ऊर्जा आणि धोरणात्मक सुरक्षा समस्यांवर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना 19 नोव्हेंबर 1998 रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
5: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. ते NSC चे मुख्य कार्यकारी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांचे प्राथमिक सल्लागार आहेत.
6: RAW आणि (Intelligence Bureau) IB सारख्या गुप्तचर संस्था राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अहवाल देतात.
हेही वाचा - Venkaiah Naidu visit to Goa : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा दौऱ्यावर! आज करणार दरबार हॉलचे उद्घाटन