ETV Bharat / bharat

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जाणाऱ्या रायफल शूटरवर काळाचा घाला; कार अपघातात मृत्यू - National Rifle Shooter Killed in madhya pradesh

दोन्ही खेळाडू एसयूव्ही कारमधून इंदूरहून धारच्या दिशने येत होते. धारजवळ फोरलेनमध्ये कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. आदळल्यानंतर कारने पलटी घेतली.

National Rifle Shooter Killed
National Rifle Shooter Killed
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:51 PM IST

Updated : Jul 29, 2021, 7:36 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या रायफल शूटरचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात एसयूव्ही कारने नियंत्रण गमाविल्याने धार शहराजवळ झाला आहे. नमन पालीवाल असे मृत रायफल शूटरचे नाव आहे. अपघातात दुसरी रायफल शूटर गंभीर जखमी आहे.

दोन्ही खेळाडू एसयूव्ही कारमधून इंदूरहून धारच्या दिशने येत होते. धारजवळ फोरलेनमध्ये कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. आदळल्यानंतर कारने पलटी घेतली. घटनास्थळीच रायफल शूटर नमन पालीवलचा मृत्यू झाला. कारमध्ये इतर महिला व पुरुष खेळाडूदेखील होते.

हेही वाचा-60 वर्षांपासून 'चहासह कॉलेजच्या आठवणींचा गोडवा जोपासणारी भावंडे'

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी अपघात-

अपघाताची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी धार जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका पाठविण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला इंदूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण-तरुणी हे रायफल शूटर होते. ते राजस्थानमधील सीकर येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते.

हेही वाचा-शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण; सचिन तेंडुलकरने केली मदत

खेळाडूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला-

धार येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर रितेश पाटीदार म्हणाले, की नमन पालीवाल हे इंदूरमधील महिला खेळाडूसमवेत कारमधून जात होते. धारजवळ मोदी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. घटनास्थळी नमन पालीवाल यांचा मृत्यू झाला. तर महिला खेळाडू गंभीर जखमी आहे. खेळाडूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अपघाताची पोलीस चौकशी करत आहेत.

हेही वाचा-दिल्ली: ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट

Last Updated : Jul 29, 2021, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.