ETV Bharat / bharat

Rahul Gandhi ED Enquiry : राहुल गांधींची ईडीकडून चौकशी.. काँग्रेसची हिंसक निदर्शने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - नॅशनल हेरॉल्ड प्रकरण पुढील सुनावणी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ( National Herald case ) सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी ईडीकडून करण्यात येत ( Rahul Gandhi ED Enquiry ) आहे. याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, ईडीच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने करण्यात ( Congress workers protest ) आली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Congress workers protest
काँग्रेसची हिंसक निदर्शने
author img

By

Published : Jun 15, 2022, 1:22 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ( National Herald case ) सलग तिसऱ्या दिवशी चौकशी ईडीकडून करण्यात येत ( Rahul Gandhi ED Enquiry ) आहे. याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, ईडीच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने करण्यात ( Congress workers protest ) आली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ईडीच्या कार्यालयाबाहेर जाळपोळ : दिल्लीत ईडीच्या कार्यालयात राहुल गांधींची चौकशी सुरु असताना ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत हिंसक आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासापूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ईडीने राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा तपासात सहभागी होण्यास सांगितले. परिसरात अनेक बॅरिकेड्स लावण्यात आले होते.

आवाज दाबता येणार नाही : राहुल गांधी आज पुन्हा चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल यांच्या चौकशीचा हा तिसरा दिवस आहे. याला काँग्रेसकडून सातत्याने विरोध होत आहे. राहुल गांधींना ईडीच्या नोटीसविरोधात काँग्रेस सातत्याने आवाज उठवत आहे. काँग्रेसने दोन्ही दिवशी राहुल यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळ जोरदार निदर्शने सुरू केली असून, कार्यकर्त्यांनी टायर पेटवले आहेत. आमचा आवाज दाबता येणार नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Rahul Gandhi ED Enquiry : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी, ईडी कार्यालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.