हैदराबाद : दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भारतात 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील हातमाग उद्योगाला सक्षम बनवण्याच्या आणि हातमागांना जगभरात मान्यता मिळावी या उद्देशाने साजरा केला जातो. 'हातमाग' हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कपड्यांपासून घराच्या सजावटीपर्यंत हातमागाचा आता विशेष समावेश केला जात आहे. त्यामुळे या उद्योगात रोजगार वाढला असून कारागिरांची स्थितीही सुधारत आहे.
स्वावलंबी बनण्याची संधी : मोठ्या संख्येने लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच हातमागामुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळते. आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत, जी विशेषत: हातमागांसाठी ओळखली जातात. यामध्ये आंध्र प्रदेशची कलमकारी, गुजरातची बांधणी, तामिळनाडूची कांजीवरम आणि महाराष्ट्राची पैठणी, मध्य प्रदेशची चंदेरी, बिहारची भागलपुरी रेशीम असे काही हातमाग आहेत ज्यांची जगभरात ख्याती आहे.
हातमागाचा इतिहास : 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. त्याच दिवशी कोलकात्याच्या 'टाऊन हॉल'मध्ये मोठ्या जाहीर सभेने स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय हातमाग दिन' साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधानांनी या दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2023 रोजी 9वा 'हातमाग दिन' साजरा केला जाईल.
हातमाग दिन का साजरा केला जातो ? 'हातमाग दिन' साजरा करण्याचा मुख्य उद्देश लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, हा आहे. याशिवाय, विणकर समाजाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने 'हातमाग दिन' साजरा केला जातो. हातमागापासून बनवलेल्या वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे भारताला वेगळी ओळख मिळेल, तसेच विणकर समाजालाही पुढे जाण्याची संधी मिळेल.
हेही वाचा :