हैदराबाद: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. हे निकाल उमेदवारांना मिळालेले गुण आणि त्यांची NEET-PG 2023 रँक दर्शवतात. उमेदवार त्यांचा निकाल NBEMA वेबसाइट www.natboard.edu.in आणि www.nbe.edu.in वर पाहू शकतात.
निकालात पात्र घोषित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन : या वर्षी सुमारे 2.9 लाख विद्यार्थ्यांनी NEET PG परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी केली होती. NEET-PG 2023 हे 2023-24 प्रवेश सत्रासाठी MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, यंदाचा 'NEET-PG 2023 चा निकाल आज जाहीर झाला आहे! निकालात पात्र घोषित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
NBEMS - natboard.edu.in : NBEMS ने मंगळवार, 14 मार्च रोजी NEET PG 2023 चा निकाल जाहीर करून अधिकृत सूचना देखील जारी केली. अधिकृत नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, 'उमेदवारांना मिळालेले गुण आणि NEET-PG 2023 रँक दर्शविणारा NEET-PG 2023 चा निकाल NBEMS - natboard.edu.in आणि nbe.edu.in च्या वेबसाइटवर पाहिला जाऊ शकतो.'
इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च : यामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की NBEMS ने NEET-PG परीक्षा यशस्वीपणे आयोजित करून आणि विक्रमी वेळेत निकाल जाहीर करून उत्तम काम केले आहे. मी त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. अधिकृत घोषणेनुसार, NEET PG निकाल 2023 31 मार्च पर्यंत सार्वजनिक केला जाईल. माहितीनुसार, NEET-PG 2023 साठी पात्र होण्यासाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे.
हेही वाचा : Imran Khan Arrest: इम्रान खानला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले, समर्थक-पोलिसांमध्ये वाद