ETV Bharat / bharat

राहुल गांधी हे इच्छाधारी हिंदू- मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची खरमरीत टीका - राहुल गांधीवर टीका

भाजपचे आमदार समर्थकांसहित शहरातील अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, की 1925 मध्ये योग्यवेळी आरएसएस अस्तित्वात आली. जर आरएसएस नसती तर काँग्रेसने हिंदुंना पळवून पळवून मारले असते. जर राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला नाही तर, न्यायालयात जाऊ.

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची खरमरीत टीका

author img

By

Published : Sep 16, 2021, 8:14 PM IST

भोपाळ - राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी हे इच्छाधारी हिंदू आहेत. ते सोयीप्रमाणे टोपी आणि टिळा लावतात. धार्मिक पर्यटनाकरिता जाऊन बोलतात, अशी टीका मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी हिदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप आमदार शर्मा यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक सलोखा बिघडत असल्याचे आमदार शर्मा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आमदार रामेश्वर शर्मा  यांचे निवेदन
आमदार रामेश्वर शर्मा यांचे निवेदन

हेही वाचा-गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!

भाजपचे आमदार समर्थकांसहित शहरातील अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, की 1925 मध्ये योग्यवेळी आरएसएस अस्तित्वात आली. जर आरएसएस नसती तर काँग्रेसने हिंदुंना पळवून पळवून मारले असते. जर राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला नाही तर, न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • #WATCH राहुल गांधी इच्छाधारी हिंदू हैं, वे सुविधा से टोपी और टीका लगाते हैं, धार्मिक पर्यटन पर जाते हैं और धार्मिक पर्यटन पर जाने के बाद वे इस तरह की बात करते हैं: मध्य प्रदेश के गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, भोपाल, मध्य प्रदेश pic.twitter.com/wToZkeDxwp

    — ANI_HindiNews (@AHindinews) September 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-सैदाबाद बलात्कार प्रकरण - आरोपीची आत्महत्या

काय म्हणाले होते राहुल गांधी?

भाजपकडून फायद्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. भाजपला हिंदुत्वाची काळजी नाही. ते केवळ स्वार्थासाठी धर्माचा वापर करत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली होती. ते पक्षाच्या महिला मेळाव्यात बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, की हे खोटे हिंदू आहेत. हिंदू धर्माचा प्रयोग करत आहेत. हे हिंदू नाहीत. तर धर्माची दलाली करतात. ते स्वत:ला हिंदू पक्ष म्हणून घेतात. मात्र, लक्ष्मी व दुर्गा यांच्यावर हल्ले करतात. देवतांना संपवितात. त्यानंतर ते हिंदू असल्याचे सांगतात. कोणत्या प्रकारचे ते हिंदू आहेत? लक्ष्मी आणि दुर्गा हे महिला सशक्तीकरणाचे प्रतिक आहे. मात्र, सरकार हे नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कायदे आणि महागाईने हे महिला सशक्तीकरण संपवित आहे.

हेही वाचा-बिहारमध्ये दोन मुले अचानक झाले अब्जाधीश; बँक खात्यात 960 कोटींहून अधिक रक्कम जमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.