नवी दिल्ली Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. देश-विदेशातील समर्थक त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुजरातमधील एका छोट्या गावातून येणारे नरेंद्र मोदी आज केवळ भारताचे पंतप्रधानच नव्हे तर जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी २००१ ते २०१४ पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.
![Narendra Modi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-09-2023/19529713_pmo1.jpg)
असा साजरा करणार वाढदिवस : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी दरवर्षी वेग-वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करतात. यंदा ते दिल्लीतील द्वारका येथे ७३ हजार चौरस मीटरवर बांधलेल्या 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर'चं उद्घाटन करणार आहेत. यात एक भव्य मुख्य सभागृह, १५ अधिवेशन कक्ष आणि एक भव्य बॉलरूम आहे. यासोबतच ११,००० प्रतिनिधींच्या निवासाचीही व्यवस्था आहे.
![Narendra Modi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16-09-2023/19529713_pmo3.jpg)
नरेंद्र मोदी यांचं सुरुवातीचं जीवन :
- नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातल्या वडनगर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
- १९७२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. तेथे ते स्वयंसेवक म्हणून काम करू लागले.
- १९७८ मध्ये त्यांचं चांगलं काम पाहता त्यांना वडोदरा येथं विभाग प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली.
- १९८० मध्ये त्यांना दक्षिण गुजरात आणि सुरत विभागाचा प्रचारक बनवण्यात आलं.
- १९८७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल. ते गुजरात युनिटचे सरचिटणीस बनले.
- १९८७ मध्ये त्यांनी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या न्याय रथयात्रेत सक्रिय सहभाग घेतला.
- १९८७ मध्ये भाजपानं लोकशक्ती यात्रा काढली. ३ महिने चाललेल्या या यात्रेतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.
- १९९० मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीत भाजपानं ६७ पैकी ४३ जागा जिंकल्या. भाजपाच्या या विजयात नरेंद्र मोदींच मोठं योगदान होतं.
![Narendra Modi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-09-2023/19529713_pmo2.jpg)
गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान :
- नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- २२ मे २०१४ पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं.
- गुजरातमध्ये त्यांनी भाजपाला सलग ३ निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला.
- या कामगिरीनं त्यांनी राष्ट्रीय मंचावर स्वत:ची मजबूत ओळख निर्माण केली.
- २०१४ मध्ये त्यांच्या नेतृत्वात भाजपानं लोकसभा निवडणूक जिंकली व ते देशाचे पंतप्रधान बनले.
![Narendra Modi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-09-2023/19529713_pm1.jpg)
सलग दोन वेळा पंतप्रधान बनले :
- नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमतानं विजय मिळवला.
- ३० मे २०१९ रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
- नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचचे खासदार आहेत.
हेही वाचा :