बंगळुरू - कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लसीकरण मोहिम देशात सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लशीचा डोस मिळाला नसतानाही नागरिकाला डोस मिळाल्याचे संदेश मोबाईलवर मिळाला आहेत.
म्हैसुरमधील मधुसुदन हे लशीचा डोस मिळण्याची वाट पाहत होते. मात्र, त्यांना अचानक मोबाईलवर लसीकरण यशस्वी झाल्याचा मोबाईलवर संदेश मिळाला आहे. त्यांनी लसीकरणासाठी 28 एप्रिलला नोंदणी केली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात लशीचा स्लॉटदेखील मिळाला. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर लशींचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुपारनंतर लशीसाठी येण्यास सांगितले.
हेही वाचा-कोविड 'त्सुनामी'वर मात करण्यासाठी लॉकडाऊनच हवा
रुग्णालयाकडून फसवणूक झाल्याचा आरोप
दुपारी लस मिळण्याच्या आशेने गेल्यानंतरही मधुसुदन यांचा हिरमोड झाला. त्यांच्याबरोबर अनेकांना लशीचा डोस न मिळाल्याने घरी परतावे लागले. मात्र, घरी येताच त्यांना लसीकरण यशस्वी झाल्याचा मोबाईलवर संदेश आला. त्यांना रुग्णालयात धाव घेत जाब विचारला. त्यावर रुग्णालयाच्या प्रशासनाने लसीकरण झाल्याने मोबाईल संदेश मिळाल्याचे सांगितले. रुग्णालयाने फसवणूक केल्याचा आरोप मधुसुदन यांनी केला आहे.
हेही वाचा-दूध उत्पादक शेतकरी संकटात; लिटरमागे 5 रुपयांचा तोटा