ETV Bharat / bharat

Mysterious Fire in House: चंद्रग्रहणानंतर 'या' घरात घडत आहे आगीच्या रहस्यमयी घटना, आगीचे कारण कोणालाच कळेना! - वीज कनेक्शन नसलेल्या घरात आग

हल्दवणी येथे वीज कनेक्शन नसलेल्या घरात आग लागते आहे. (Mysterious Fire in House). 8 नोव्हेंबरच्या चंद्रग्रहण आणि भूकंपानंतर आगीच्या या घटना घडत आहेत. (fire in house since lunar eclipse). विद्युत विभागही आगीचे कारण शोधण्यात अपयशी ठरत आहे.

Mysterious Fire in House
Mysterious Fire in House
author img

By

Published : Nov 17, 2022, 7:02 PM IST

हल्दवानी - नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथील एक कुटुंब सध्या दहशतीच्या छायेत जगत आहे. शहरातील तल्ला गोरखपूर येथील रहिवासी उमेश पांडे यांच्या घरात वीज कनेक्शन तोडूनही पुन्हा पुन्हा आगीच्या भडक्या होत आहेत. (house fire without electricity) (Mysterious fire in house). या संपूर्ण प्रकरणामध्ये विद्युत विभाग आणि जिल्हा प्रशासन या गूढ आगीच्या तपासात गुंतले आहे. (Mysterious fire in house in Haldwani)

चंद्रग्रहणानंतर आग - पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, 8 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण आणि भूकंपानंतर त्यांच्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अचानक आग लागली. घाईघाईत घरातील सदस्यांनी विद्युत विभागाला फोन करून घराचे कनेक्शन तोडले. मात्र कनेक्शन तोडल्यानंतरही घरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले प्लास्टिकचे विद्युत फलक व तारा अचानक पुन्हा जळू लागल्या. गेल्या 8 दिवसांपासून घरात आग लागत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या घरात घडत आहे आगीच्या रहस्यमयी घटना

8 दिवसांत आगीच्या 20 घटना - बंद लोखंडी अलमारी, बंद बेडच्या आत ठेवलेले कपडे, बेडच्या वर ठेवलेले बेडिंग यांनाही आग लागते आहे. गेल्या 8 दिवसात आगीच्या सुमारे 15 ते 20 घटना घडल्या आहेत. घराबाहेर विद्युत कनेक्शन न ठेवताही कुलरने अचानक पेट घेतला. गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण कुटुंब दहशतीत आहे. घरातील सर्व सामान रिकामे करून बाहेर ठेवले गेले आहे.

वीज विभाग पोलीस सगळेच गोंधळले - कुटुंबातील सर्व सदस्य रात्रभर चौकीदारी करत जागे राहत आहेत. अचानक धूर आणि जळण्याचा वास येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर कुटुंबीय आग विझवण्यासाठी धाव घेत आहेत. याप्रकरणी विद्युत विभागाकडून घरात अर्थिंगही करण्यात आले. मात्र अर्थिंग करूनही घराला आग लागली आहे. सततच्या घटनेची माहिती कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस या गूढ घटनेच्या तपासात गुंतले आहेत.

गूढ आगीचा तपास सुरू - या संपूर्ण प्रकरणामध्ये सिटी मॅजिस्ट्रेट रिचा सिंग सांगतात की, कोणत्या परिस्थितीत घराला आग लागली त्याची पडताळणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पंतनगर विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या गूढ आगीच्या घटनेचा तपास पथक करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.