बंगळुरू - एका तरुणाचा वाहतूक पोलिसांशी भर रस्त्यात हुज्जत घालताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो पोलिसांशी वाद घालताना दिसत असून आपले वडिल आंध प्रदेशमध्ये खासदार असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकाच्या उडुपी शहरातील आहे. तो पोलिसांशी आरेरावीची भाषा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन करूनही त्याने दंड भरण्यास नकार दिला.
माझे वडिल आंध्र प्रदेशमध्ये खासदार आहेत. आंध्र प्रदेश सरकारचे गृह विभाग सचिव हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत. ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जवळचे आहेत. मी त्यांना कॉल करतो. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मी ओळखतो. मी का दंड भरू, असे म्हणताना तो तरूण दिसत आहे.
संबंधित तरुणाचे नाव अनुराग रेड्डी असे आहे. तो मनिपाल विद्यापीठाचा एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. त्याला वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी थांवबले. त्यांची अल्कोहोलची चाचणी केली तेव्हा अल्कोहोलचे सेवन 193 युनिट होते. अद्याप त्याच्या वडिलांचे नाव समोर आलेले नाही.
ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी आरोपी अनुराग रेड्डीची गाडी ताब्यात घेतली आहे. त्यांच्यावर मद्यपान करून वाहन चालवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. उडुपी वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.