भागलपूर (बिहार) : बिहारमधील भागलपूरचे पीरपेंटी काली मंदिर अशाच एका लग्नाचे साक्षीदार ठरले, जिथे एका प्रेमी युगुलाने धर्माची भिंत तोडून सात जन्मांची गाठ बांधली. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे एका मुस्लिम मुलीने (Muslim Girl Marriage To Hindu Boy In Bhagalpur) तिचा धर्म बदलून सनातन धर्म स्वीकारत हिंदू मुलाशी लग्न केले (Muslim girl married a Hindu boy) आहे. दोघांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध (Hindu Boy and Muslim Girl Love affair) होते. मात्र, लग्न झाल्यानंतर आता मुलीच्या घरातील लोक तिला जीवे मारण्याच्या धमक्या (Death threats to Muslim girl) देत आहेत. त्यानंतर मुलीने पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची विनंती केली आहे.
हिंदू मुलाशी लग्न केल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या : गोड्डा जिल्ह्यातील मेहरमा भागात राहणारा राम कुमार मुस्कान खातून नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. दोघांमधील प्रेमाची ही मालिका 1 वर्ष चालली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलगी मुस्लिम असल्याने आणि तिच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने 17 ऑक्टोबर रोजी मुलीने घरातून पळ काढला आणि लग्नासाठी गोड्डा कोर्ट गाठले. तेथे दोघेही वकिलाला भेटले, मात्र मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळाली. मुस्कानच्या कुटुंबीयांनी कोर्टात पोहोचून मुलीला आवारात मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मुलीला पोलिस संरक्षण देण्यात आले.
'मी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे' : कोर्टात जबाब देताना मुलीने सांगितले की, मी माझ्या इच्छेने लग्न करत असून या लग्नापासून मी आनंदी आहे. त्याचवेळी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत मुलीने पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली. याच कोर्टात जबाब दिल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून मुलीला सुरक्षा पुरवण्यात आली आणि मुलीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
"माझ्या घरातील सदस्य लग्नासाठी तयार नव्हते. आता मम्मी, पप्पा, मामा सगळेच मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मी माझ्या स्वेच्छेने लग्न केले, कोणताही दबाव नव्हता. आता आम्हाला भीती वाटत आहे. आमच्या जीवाला धोका आहे. सुरक्षाही नाही" - मुस्कान खातून, प्रेमिका
इस्लामचा त्याग करून मुलीने सनातन धर्म स्वीकारला : यानंतर मुलीने सनातन धर्माचा अंगीकार करून पिरपेंटीच्या मीनाक्षी मंदिरात तिच्या प्रियकरासोबत विवाह केला (भागलपूरमध्ये मुस्लिम मुलीने सनातन धर्म स्वीकारला). या लग्नाला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. लग्नानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुलाने सांगितले की, या लग्नामुळे आम्ही खूप खूश आहोत आणि कायम सोबत राहू इच्छितो. त्याचवेळी, मुलीने असेही सांगितले की तिचे मामा आणि मावसा तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे.