ETV Bharat / bharat

Prisoner Shot Dead: पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात आणलेल्या आरोपीची गोळ्या झाडून हत्या, एकास अटक - prisoner murder in saharsa

बिहारच्या सहरसा येथील न्यायालयाच्या आवारात भरदिवसा न्यायालयात आणलेल्या आरोपीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. कैद्याची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. घटनास्थळावरून शस्त्रासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Murder in Saharsa : Prisoner shot dead in Saharsa court premises, produced today
पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात आणलेल्या आरोपीची गोळ्या झाडून हत्या, एकास अटक
author img

By

Published : Mar 28, 2023, 7:41 PM IST

सहरसा (बिहार): बिहारमधील सहरसा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारात मंगळवारी एका कैद्याची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने त्या कैद्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रभाकर पंडित असे मृत कैद्याचे नाव आहे. या कैद्याला न्यायालयात तारीख होती आणि तो तारखेला हजर राहण्यासाठी न्यायालयात पोहोचला होता. कैद्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला शस्त्रासह अटक केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लिपी सिंह यांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

दुचाकीवरून आले गुन्हेगार : प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या या कैद्याला न्यायालयाच्या आवारातच गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याची घटना घडवली. न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले कैदी प्रभाकर पंडित यांच्यावर गुन्हेगारांनी सुमारे तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो तिथेच खाली पडला. न्यायालयाच्या आवारात गोळीबार व खुनाच्या घटनेमुळे तेथे नागरिकांची गर्दी झाली होती.

प्रभाकर कारागृहात : हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी मृत झालेल्या कैद्याचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती. यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. ज्या व्यक्तीवर गोळी झाडली तो एका खुनाच्या गुन्ह्यात सिरहासा तुरुंगात अटकेत होता.

एकाला अटक : घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. घटनेची माहिती देताना जिल्हा कॅप्टन लिपी सिंह यांनी सांगितले की, हत्येतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या न्यायालयाच्या आवारात अशा प्रकारे हजेरीसाठी आणलेल्या कैद्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. न्यायालयात पोलिसांच्या समोर दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपीची हत्या केल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

हेही वाचा: फरार असलेला अमृतपाल दिल्लीत पगडी काढून फिरला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.