धौलपूर (राजस्थान) Rajasthan Gang Rape : राजस्थानच्या धौलपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे मुंबईतील एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचं आमिष दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेनं मुख्य आरोपीसह ६ जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यासह पीडितेनं राष्ट्रपती, राज्यपाल आणि राजस्थानचे एडीजी यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरणाची चौकशी सुरू : घटनेचा तपास करत असलेले सीओ सुरेश सांखला यांनी सांगितलं की, मुंबईतील एका महिलेनं सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिनसह सहा जणांची नावं आहेत. पीडित महिलेचे जबाब घेण्यात येत आहेत. या महिलेचं मेडिकल बोर्ड करणार असून, पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दागिने आणि रोकडही लंपास : महिला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पीडित महिलेनं सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तिची राजस्थानच्या धौलपूर शहरात राहणाऱ्या सचिन नावाच्या तरुणाशी ओळख झाली. सचिन मुंबईत नोकरी करायचा. दोघांची मैत्री झाली. पीडितेनं रिपोर्टमध्ये आरोप केला आहे की, ३ महिन्यांपूर्वी सचिननं तिला लग्नाच्या बहाण्यानं ट्रेननं धौलपूरला आणलं. तेथे पोहोचल्यानंतर सचिननं पीडितेकडून दीड लाख रुपयांचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड काढून घेतली.
जीवे मारण्याची धमकी : यानंतर सचिननं महिलेला अज्ञात स्थळी नेलं. तेथे आधीच पाच तरुण उपस्थित होते. सर्व आरोपींनी महिलेला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. आरोपींनी पुन्हा महिलेला धौलपूरला आणले. तिथे तिची तब्येत बिघडू लागली. त्यानंतर आरोपीनं महिलेला मुंबईचं तिकीट दिलं आणि तिला धौलपूर स्थानकावरून रवाना केलं. पीडितेनं आरोप केला आहे की, मुंबईला पोहोचल्यावर आरोपी सचिन तिला मोबाईलवरून घटनेची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता.
राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे न्यायाचं आवाहन : या घटनेने त्रस्त झालेल्या पीडित महिलेनं अखेर धौलपूर गाठलं. शुक्रवारी तिनं महिला पोलीस ठाण्यात आरोपी सचिनसह अन्य पाच जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित महिलेनं राष्ट्रपती, राज्यपाल आणि राजस्थान पोलिसांचे डीजीपी यांना पत्र लिहून न्यायाची याचना केली आहे. महिलेनं पत्राद्वारे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
हे वाचलंत का :