ETV Bharat / bharat

Mumbai Taxi : मुंबईकरांची शान होणार इतिहासात जमा; 'काळी पिवळी'चा संपणार प्रवास....

Mumbai Taxi : यावर्षी मुंबई दोन प्रतिष्ठित वाहतूक साधनांना निरोप देत आहे. आता काळी पिवळी टॅक्सीचा मुंबईच्या रस्त्यांवरील प्रवास संपणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये शहरातील चर्चित बेस्ट डबल डेकर बस सेवाही बंद करण्यात आली होती. आता काळ्या-पिवळ्या टॅक्सींना निरोप देण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

Mumbai Taxi
'काळी पिवळी टॅक्सी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 12:09 PM IST

Updated : Oct 30, 2023, 12:35 PM IST

हैदराबाद : Mumbai Taxi मुंबईच्या रस्त्यावर फिरायचं म्हणलं की 'काळी पिवळी' टॅक्सीचं चित्र नक्कीच मनात उमटतं. अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्व मुंबईकरांच्या वाहतुकीचं साधन असलेली ही टॅक्सी सेवा 'काली-पिली' म्हणून ओळखली जात होती. स्वप्नांच्या शहरात प्रत्येक कोपऱ्यात काळी पिवळीची आठवण दडलेली आहे. महानगरीचं आणि टॅक्सीचं अतुट नातं असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा 'प्रवास' संपणार आहे. अलीकडेच सार्वजनिक बेस्टच्या प्रसिद्ध लाल डबल डेकर डिझेल बसेस रस्त्यावरून हटवल्यानंतर आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीही या रस्त्यावरुन गायब होणार आहेत. यानिमित्ताने मुंबईच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जडणघडणीचा साक्षीदार कायमची रजा घेणार आहे.

1964मध्ये पद्मिनीनं सुरू केला होता प्रवास : 'प्रीमियर पद्मिनी'नं 1964 मध्ये 'फियाट-1100 डिलाइट' मॉडेलनं टॅक्सी म्हणून आपला प्रवास सुरू केला. या शक्तिशाली 1200 सीसी कारचे गीअर्स स्टिअरिंगमध्ये असायचे. लाँच झाल्यानंतर एका वर्षात त्याचे प्रीमियर प्रेसिडेंट असे नामकरण करण्यात आले. यानंतर, 1974 मध्ये पुन्हा एकदा त्याचे नामकरण करण्यात आलं आणि यावेळी ती प्रीमियर पद्मिनी झाली. हे नाव एका भारतीय राणीच्या नावावरून ठेवण्यात आले. पुढील 30 वर्षे ही कार त्यांच्या नावाप्रमाणेच राहिली. लवकरच ही टॅक्सी मुंबईची ओळख बनली. आजही या टॅक्सींमध्ये बसवलेले मॅन्युअल मीटर खाली केल्यावर निघणारा आवाज जुन्या लोकांना आठवत राहतो. आता टॅक्सींमध्ये स्वयंचलित विद्युत मीटर बसवले आहेत. जेव्हा फियाट पहिल्यांदा मुंबईच्या रस्त्यावर आली तेव्हा प्लायमाउथ, लँडमास्टर सारख्या मोठ्या टॅक्सी रस्त्यावर धावत होत्या.

किंमत ७० आणि ८० च्या दशकात गगनाला भिडली होती : मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 60 च्या दशकात पद्मिनीला प्राधान्य दिलं होतं. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची आकर्षक रचना आणि नेमक्या उंचीची ठेवण मुंबईच्या अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांमध्ये उपयुक्त ठरली. 70 आणि 80 च्या दशकात या टॅक्सीची लोकप्रियता गगनाला भिडली. 90 च्या दशकात परिवहन विभागात विक्रमी 63,200 टॅक्सींची नोंदणी झाली होती. अत्यंत माफक दरात परवडणारा प्रवास देणारी ही टॅक्सी सेवा आता मुंबईच्या रस्त्यावर धावणं बंद होणं, ही मुंबईची एक खास ओळख मिटण्यासारखं आहे.

हेही वाचा :

  1. World Occupational Therapy Day 2023 : 'जागतिक ऑक्युपेशनल थेरपी दिवस' 2023; जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व
  2. World Osteoporosis Day 2023 : 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस' 2023; जाणून घ्या त्याचं महत्त्व आणि इतिहास
  3. World Stroke Day 2023 : जागतिक स्ट्रोक दिवस 2023; 'या' कारणांमुळे तुम्ही लहान वयातच होऊ शकता स्ट्रोकचे शिकार

Last Updated : Oct 30, 2023, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.