ETV Bharat / bharat

BMC Budget 2022 : मुंबई मनपाचा ४५९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प! पहा कुणाला काय मिळाले - मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कुणाला काय मिळाले

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. (Mumbai Municipal Budget 2022) या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. (Budget for the Year 2022-23) २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

BMC Budget 2022
मुंबई महापालिका अर्थसंकल्प
author img

By

Published : Feb 3, 2022, 1:31 PM IST

Updated : Feb 3, 2022, 3:01 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. (Provision of digital education) ८.४३ कोटी शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. २०२२ - २३ चा अर्थसंकल्प २०२१ - २२ या वर्षापेक्षा १७.७० टक्के मोठा आहे.

मुंबई मनपाचा ४५९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्प १७.७० टक्के मोठा -

मागील वर्षापेक्षा हा अर्थसंकल्प १७.७० टक्के मोठा आहे. (Mumbai Municipal Corporation General Election) मागील वर्षापेक्षा यंदाचा अर्थसंकल्प ६९१०.३८ कोटींनी वाढला आहे. २०२१ - २२ च्या आर्थिक वर्षात महसूली खर्च २०२७६.३३ कोटी वरून २२७४४..८७ कोटी असा सुधारित करण्यात आला आहे. २०२२ - २३ साठी महसुली खर्च २३२९४.०५ कोटी इतका प्रास्ताविण्यात आला आहे. तर २०२१ मध्ये भांडवली खर्च १८७५०.९९ कोटी अंदाजाला होता. तो १६८६६ कोटी असा सुधारित करण्यात आला आहे. जानेवारी २०२२ पर्यंत ९५७५.४८ कोटी म्हणजेच ५६.७७ टक्के खर्च झाला आहे. २०२२- २३ या वर्षासाठी २२६४६.७३ कोटी भांडवली खर्चासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

राखीव निधी -

राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेल्या ३१३२३.८९ कोटी इतकी रक्कम बांधील दायित्वपोटी विश्वासार्हता म्हणून तर ५५८०७.६८ कोटी पायाभूत प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. यामुळे राखीव निधी हे मुंबईच्या नागरिकांना पायाभूत सुविधांची दरजोन्नती करण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येईल. बेस्टला ८०० कोटी रुपयांचे अर्थ साहाय्य केले जाणार आहे. पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांवर इलेकट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनची स्थापन केली जाणार आहे. मुंबई वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचे काम प्रगतीपथावर आहे असे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

विशेष तरतुदी -

  • रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प - ८९७३.८७ कोटी
  • घन कचरा व्यवस्थापन - ४९८२.८३ कोटी
  • आरोग्य - ६९३३.७५ कोटी
  • पर्जन्य जलवाहिन्या - २१३२.७६ कोटी
  • प्राथमिक शिक्षण - ३३७०.२४ कोटी

इतर तरतुदी -

  • कोस्टल रोडसाठी ३२०० कोटी
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड १३०० कोटी
  • सुरक्षित शाळा २२०० कोटी
  • पुलांच्या नवीन कामांसाठी - १५७६.६६ कोटी
  • पर्जन्य जल वाहिन्या आणि मिठी नदीचे पुनरुज्जीवन, पूर नियंत्रण - ५६५.३६ कोटी
  • दहिसर, पोयसर, ओशिवरा, वाळभट नद्यांचे पुनरुज्जीवन - १५३९.७९
  • आरोग्य पायाभूत सुविधांसाठी - २६६६०.५६ कोटी
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेसाठी - १४६०.३१ कोटी \
  • कचरा व्यवस्थापनचे मोठे प्रकल्प - १६७.८७ कोटी
  • उद्यानांची प्रगती पथावरील कामे - १४७.३६ कोटी
  • वीर जिजाबाई भोसले उद्याने व प्राणी संग्रहालय - ११५.४६ कोटी
  • मुंबई अग्निशन दल - ३६५.५४ कोटी
  • महानगर पालिकेच्या मंड्यांसाठी - १२१.७२ कोटी
  • इमारत परिरक्षण खात्यासाठी ४२९.६४ कोटी
  • पशुवैद्यकीय आरोग्य खाते व देवाण पशुवध गृहसाठी ३८.३८
  • आपत्कालीन व्यवस्थापन - ३.७१ कोटी
  • कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा - २०० कोटी
  • पाणीपुरवठा नवीन प्रकल्प २०० कोटी
  • मध्य वैतरणा जलाशय येथे अक्षय ऊर्जा प्रकल्प - १०.३० कोटी
  • जलवाहन बोगदे - ४६७ कोटी
  • जलाशयांची दुरुस्ती - ७१ कोटी
  • जलवितरण सुधारणा कामे - ६२३.१२ कोटी
  • मलनिःस्सारण प्रचालन जुन्या वाहिन्या बदलणे - १९५.४२ कोटी

हेही वाचा - पाकिस्तान,चीन, पेगासस अन् बेरोजगारीवर राहुल गांधींचे भाष्य, दिला मोठ्या धोक्याचा इशारा, वाचा सविस्तर....

Last Updated : Feb 3, 2022, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.