मुंबई मूळचे भारतीय असलेले पती-पत्नी ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायी झाले होते. या दाम्पत्याला ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व देखील मिळाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर या दांपत्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला Indian couples dispute in Australian Court घटस्फोट Indian couple divorce in Australian court घेतला. ऑस्ट्रेलियन न्यायालयाने या प्रकरणात पतीने पत्नीला पोटगी alimony to wife म्हणून 32 लाख रुपये देण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाला पतीने मुंबई कौटुंबिक न्यायालयात Mumbai Family Court आव्हान दिले होते. कौटुंबिक न्यायालयाने ऑस्ट्रेलियन न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पतीने 32 लाख रुपये पत्नीला देण्याचे निर्देश दिले आहे. कौटुंबिक न्यायालयाने पतीला एक प्रकारे दणका दिला आहे.
पतीच्या पदरी भारतीय न्यायालयातही निराशाच या घटस्फोट प्रकरणाची सुरुवात खरंतर ऑस्ट्रेलियातून झाली होती. मूळचे भारतीय असलेलं दाम्पत्य ऑस्ट्रेलियात जाऊन तिथे स्थायी झाले. त्यानंतर तिथले नागरिकत्वही या दाम्पत्याला मिळाले होते. सुरुवातीला पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप पतीवर केला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या आरोपांवर ऑस्ट्रेलियातील कोर्टात खटलाही चालला. या खटल्यात ऑस्ट्रेलियन कोर्टाने दिलेला निर्णय मानण्यास पतीने नकार दिला होता. त्यानंतर अखेर पीडित पत्नीला भारतीय न्यायालयाचे दार ठोठावले. अखेर मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता पीडित पत्नीला 32 लाख रुपये दंड देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता 55 वर्षीय पतीला निर्देश देण्यात आले असून तसे न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असेही कोर्टाने म्हटले आहे.
पत्नीचा पतीवर मारहाणीचा आरोप 1991 साली पीडित महिलेचे लग्न झाले होते. त्यानंतर ही महिला पत्नीसोबत 1994 साली यूएसमध्ये राहायला गेली होती. या दाम्पत्याला 1995 आणि 2004 साली मूलही झाले. दोन मुले असलेल्या या दाम्पत्यामध्ये 2005 सालापासून खटके उडू लागले. पती पत्नीला मारहाण करु लागला होता. पत्नी अखेर पतीपासून वेगळी राहू लागली. 2006 साली या महिलेने ऑस्ट्रेलियाच्या कोर्टात पतीविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल पत्नीच्या बाजूने लागला. पण पतीने आपल्या पत्नीवर पुन्हा गंभीर आरोप केले. खोटे आरोप आणि फसवणूक करुन पत्नीने या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावला असल्याचा दावा केला होता. पण हा दावा भारतीय न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. अखेर कोर्टाने ऑस्ट्रेलियातील कोर्टाने पतीला ठोठावलेला दंड कायम ठेवत पत्नीला दिलासा दिलाय.
32 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश 17 वर्षांपूर्वी पीडित पत्नीनं आपल्या पतीविरोधात कोर्टाची पायरी चढली. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद सुरु होता. 17 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयानं पतीला फटकारले. शिवाय पत्नीला भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत. 2009 साली पीडित पत्नी भारतातील कोर्टात दाद मागण्यासाठी आली होती. ऑस्ट्रेलियातील कोर्टात 2007 साली पीडित पत्नीची याचिका ऐकल्यानंतर कोर्टाने 32 लाख रुपये भरपाई आणि सोन्याचे दागिने देण्याचे आदेश देण्यात आले होते. पण पतीने हे आदेश आपल्याला लागू होत नाही. आपण भारतीय कायद्यानुसार विवाह केला आहे असा युक्तिवाद करत ऑस्ट्रेलियातील कोर्टाचे आदेश फेटाळून लावले होते. तसेच पत्नीने केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत असाही दावा केला होता. आपल्याला पतीपासून वेगळं राहायचं असून पतीच्या संपत्तीचा 70 टक्के वाटा आणि मुलांचा ताबा मिळावा यासाठी पीडित पत्नीने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल अखेर पीडित पत्नीच्या बाजूने लागलाय.
हेही वाचा Actor Armaan Kohli अभिनेता आरमान कोहलीची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी धाव