ETV Bharat / bharat

Bullet Train Surat Station : गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रक्लपाचे काम सुसाट; पार नदीवर बांधला जातोय पहिला पूल - bullet train surat station work

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमधील काम सध्या जोरात सुरू आहे. गुजरात राज्यातील महत्त्वाचे शहर म्हणून सुरतकडे पाहिले जाते. याच सुरतमधून आता बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. येथील कामाची काय स्थिती आहे याबाबत 'ईटीव्ही भारत'ने रिअॅलिटी चेक केला आहे. सुरत बुलेट ट्रेन स्टेशनचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. याठिकाणी पिलर टाकण्याचे काम चालू आहे. या मार्गावर एकूण 16 पिलर सध्या टाकले आहेत.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प
author img

By

Published : Jan 16, 2023, 9:21 PM IST

Updated : Jan 24, 2023, 3:47 PM IST

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरत स्टेशनची सद्यस्थिती

सुरत (गुजरात) : सुरत ते बेलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य आहे. सुरत जिल्ह्यातून 48 किलोमीटरच्या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामांना वेग आला आहे. एकूण 144.48 हेक्टर जमीन आणि 999 ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काम वेगाने सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधींना दिसून आले आहे. बुलेट ट्रेन सूरतमधील 28 गावांमधून जाणार आहे. मोठ्या मशनरीद्वारे सध्या या मार्गावर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.

पार नदीवर बांधला जातोय पहिला पूल - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीचा पहिला पूल वलसाडमधील पार नदीवर बांधला जात आहे. या पुलासाठी 8 पूर्ण स्पॅन गर्डर बांधले जात आहेत. याचा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने ट्विट केला आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून जाणाऱ्या पार नदीवर हा पूल बांधला जात आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. सुरतच्या तापी नदीवरही पुलाचे काम सुरू आहे.

कुठपर्यंत आले काम? : सुरतसह दक्षिण गुजरातमधील इतर जिल्ह्यांमध्ये जमिनीपासून ५४ फूट उंचीवर बुलेट ट्रेन धावणार आहे. इतकेच नव्हे तर १८ मीटर उंच खांब, ०८ मीटर खोल पाया, ४ मीटर रुंद रस्ताही तयार केला जात आहे. सुरतहून बुलेट ट्रेन ४८ किलोमीटरच्या परिसरातून जाणार आहे. सध्या 12 किमी परिसरात पिलरचे काम करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे अतिवेगाने धावणारी बुलेट ट्रेन आरामदायी करण्यासाठी काम सुरू आहे.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

स्टेशनची माहिती : सुरत हे शहर उद्योगांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने सुरत बुलेट ट्रेन स्टेशन महत्त्वाचे ठरणार आहे. आर्सेलर मित्तलची शाखा असलेल्या AMNS इंडियाकडून बुलेट ट्रेनसाठी चांगल्या दर्जाचे स्टील पुरविले जाणार आहे. एमएमएस इंडियाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी सूरतमध्ये याची घोषणा केली होती. त्यामुळे सुरतमधूनच बुलेट ट्रेन प्रकल्पांना स्टीलचा पुरवठा केला जाणार आहे.

mumbai ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

का महत्त्वाचे आहे स्टेशन : 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू होणार असल्याचे टार्गेट आहे. सर्व प्रथम, गुजरात विभागात सुरत-बिलीमोरा लाइन सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तोपर्यंत काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी पहिली बुलेट ट्रेनची चाचणी सुरत ते बेलीमोरा पर्यंत घेण्यात येणार आहे. 350 किलोमीटर प्रति तास वेगाने या बुलेट ट्रेनची चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा : Bullet Train Vapi Station : गुजरातच्या प्रवेशद्वाराजवळ बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात; जाणून घ्या, वापी स्टेशनची स्थिती

Last Updated : Jan 24, 2023, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.