ETV Bharat / bharat

मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा पहिल्या दहामध्ये कोण-कोण?

फोर्ब्स मासिकाच्या नव्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. मुकेश अंबानींपाठोपाठ भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी ठरले आहेत.

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी
author img

By

Published : Apr 7, 2021, 4:39 PM IST

Updated : Apr 7, 2021, 5:49 PM IST

नवी दिल्ली - अमेरिका आणि चीननंतर भारतात सर्वाधिक अब्जाधीश आहेत. फोर्ब्स मासिकाच्या नव्या यादीमध्ये असे म्हटले आहे. या मासिकाच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. मुकेश अंबानींपाठोपाठ भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी ठरले आहेत.

भारतातील अब्जाधीशांची संख्या आता वाढून 140 झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स आहे. गौतम अदानी जगातील 24 व्या स्थानावर आहे

अमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझोसची संपत्ती 177 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्याची संपत्ती 64 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

शिव नादर हे तिसरे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. ते एचसीएलचे संस्थापक आहेत. त्याच्याकडे 23.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या यादीत अव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकिशन दमानी हे चौथ्या आणि कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक पाचव्या क्रमांकावर आहेत.

उद्योगपती एकूण संपत्ती
मुकेश अंबानी84.5 अब्ज डॉलर्स
गौतम अदानी50.5अब्ज डॉलर्स
शिव नादर23.5 अब्ज डॉलर्स
राधाकिशन दमानी16.5 अब्ज डॉलर्स
उदय कोटक 15.9 अब्ज डॉलर्स
लक्ष्मी मित्तल 14.9 अब्ज डॉलर्स
कुमार बिर्ला12.8 अब्ज डॉलर्स
सायरस एस पुनावाला12.7 अब्ज डॉलर्स
दिलीप शांघवी 10.9 अब्ज डॉलर्स
सुनील मित्तल आणि कुटुंब 10.5 अब्ज डॉलर्स

कोरोना संकटातही संपत्तीत वाढ -

कोरोना साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व उद्योगांची अवस्था बिकट झाली आहे. मात्र, कोरोना संकटानंतरही भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या संपत्तीत जगभरात सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. त्यांनी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनाही मागे टाकले. या अहवालानुसार मुकेश अंबानी यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या सहा महिन्यांत दर तासाला 90 कोटींची कमाई केली.

हेही वाचा - संपूर्ण आरोग्याच्या संवर्धनासाठी आयुर्वेद हाच तुमचा आधार

Last Updated : Apr 7, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.