सोमनाथ (गुजरात) : महाशिवरात्री निमित्त सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सोमनाथमध्ये भगवान महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुलगा आकाश अंबानीही उपस्थित होता. आकाश अंबानीने महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोमनाथ मंदिराला 1.51 कोटी रुपयांचे दान दिले.
महापूजेत सहभाग घेतला : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा व रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोमनाथ महादेवाचे दर्शन घेतले. श्री सोमनाथ ट्रस्टच्या वतीने विश्वस्त पी के लाहिरी व ट्रस्टचे सचिव योगेंद्र देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी जलाभिषेकानंतर सोमनाथ महादेवाला पूजा साहित्य अर्पण केले. सोमनाथ मंदिराच्या पुजाऱ्याने मुकेश अंबानींना चंदन आणि वस्त्र परिधान करून सन्मानित केले. यावेळी मुकेश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची महापूजा, सोमेश्वर पूजा, ध्वजपूजन यात सहभाग घेतला.
1.51 कोटी रुपयांची देणगी : मुकेश अंबानी यांनी श्री सोमनाथ ट्रस्टला 1.51 कोटी रुपयांची देणगी दिली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये देखील मुकेश अंबानी आंध्र प्रदेशातील तिरुमाला मंदिरात पोहोचले होते, जिथे त्यांनी 1.5 कोटी दान केले होते. त्यावेळी मुकेश अंबानींसोबत त्यांचा मुलगा अनंतची भावी पत्नी राधिका मर्चंटही उपस्थित होती. 1 फेब्रुवारीला अनंत अंबानी वाराणसीमधील बाबा विश्वनाथ धाममध्ये दर्शनाला पोहोचले होते. तेथे त्यांनी विशेष पूजा केली होती. तसेच 25 जानेवारीला अनंत अंबानी ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या दर्शानाला पोहचले होते.
गेल्या महिन्यात अनंत अंबानींचा साखरपुडा झाला : 19 जानेवारीला अनंत अंबानी यांचा रोजी उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटमध्ये अनेक क्रिकेटर्ससह बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोक पोहोचले होते. 'अँटीला' या मुकेश अंबानी यांच्या गगनचुंबी इमारतीमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट झाली होती. दोघांच्याही एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिज्युअलमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट रिंग त्यांच्या पाळीव कुत्र्याने आणलेली दिसत होती. या प्रसंगी अंबानी कुटुंबाने या कपलला सरप्राईज म्हणून एक खास डान्स परफॉर्मन्सही केला होता.
हेही वाचा : Amit Shah Met MP Girish Bapat : अमित शाह यांनी घेतले ओंकारेश्वरचे दर्शन, खासदार गिरीश बापट यांची भेट