ETV Bharat / bharat

INDIA Parties MPs Manipur visit: विरोधी आघाडीचा मणिपूर दौरा; 'इंडिया'चे 21 खासदार मणिपूरसाठी रवाना - मणिपूर हिंसाचार

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून जातीय हिंसाचार होत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधकांच्या घटक पक्षाची आघाडी असलेल्या 'इंडिया'चे 21 खासदार दोन दिवसाचा मणिपूर दौरा करणार आहेत. या दरम्यान ते हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

इंडियाच्या 20 खासदारांचा मणिपूर दौरा
इंडियाच्या 20 खासदारांचा मणिपूर दौरा
author img

By

Published : Jul 29, 2023, 10:35 AM IST

Updated : Jul 29, 2023, 10:46 AM IST

नवी दिल्ली: मागील तीन महिन्यापासून मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच्या घटनांवरुन केंद्रातील सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधीपक्षाची टीम 'इंडिया' मणिपूर दौरा करणार आहे. विरोधकांच्या 'इंडिया' या आघाडीच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ तेथील हिंसाचारग्रस्त भाग आणि मदत केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाष्य करावे, अशी मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे.

16 घटक पक्षांचा मणिपूर दौरा : मणिपूर हिंसाचारावर विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. विरोधकांनी संसदेतील दोन्ही सभागृहात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला आहे. मणिपूरच्या घटनेवरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'चे एक शिष्टमंडळ दोन दिवसाचा मणिपूर दौरा करणार आहे. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर खासदार सोमवारी सभागृहाला परिस्थितीची माहिती देणार आहेत. शिष्टमंडळात 16 घटक पक्षांचे 21 खासदार आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हेदेखील या शिष्टमंडळात आहेत.

विरोधी पक्षाचे खासदार रवाना :

इंडिया आघाडीचे खासदार दिल्ली विमानतळावरून मणिपूरला रवाना झाले आहेत. आघाडीचे 21 खासदार आज इम्फाळला जाणार आहेत.

हे खासदार आहेत मणिपूर दौऱ्यात: मिळालेल्या माहितीनुसार, खासदार मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील स्थानिक नागरिकांशी बोलून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मणिपूर दौऱ्यावर गेलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे गौरव गोगोई आणि फुलोदेवी नेताम, राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग आणि जनता दल युनायटेडचे अनिल हेगडे, यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पीपी मोहम्मद फैजल, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन आणि वीसीके पक्षाचे थिरुमावलवन यांचाही यात सहभाग आहे. याशिवाय शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) अरविंद सावंत, सीपीआयचे संतोष कुमार, माकपचे ए ए रहीम, समाजवादी पक्षाचे जवाद अली खान, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, डीएमकेचे डी रवी कुमार आणि आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर यांचाही देखील या शिष्टमंडळात सहभाग असेल.

  • I.N.D.I.A parties MPs at Delhi airport to leave for a two-day visit to Manipur to assess the ground situation and meet the people there

    (Photo source: Congress) pic.twitter.com/IM1Wa0MbIi

    — ANI (@ANI) July 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मणिपूर मुद्द्यावर विरोधक आक्रमक :

अरविंद सावंत -

गेल्या 75 दिवसांपासून मणिपूर जळत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार आणि मृत्यूमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने काही पावले उचलायला हवी होती, असा हल्लाबोल शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केला आहे.

  • #WATCH | Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, "Manipur has been burning for the last 75 days...The atrocities against women & deaths in the state will only tarnish the country's image. In such a situation the govt should have taken some action..." pic.twitter.com/1LI6eWkBa5

आरजेडीचे खासदार मनोज झा हे देखील विरोधी पक्ष आघाडीच्या या शिष्टमंडळात आहेत. मणिपूरला जाण्यापूर्वी ते म्हणाले की, आम्ही तेथील लोकांचे म्हणणे ऐकून त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व समाजातील लोकांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करू. हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे.

  • #WATCH | "We will meet the people of Manipur. The State has been burning for months now, and peace needs to be restored there. The PM is speaking on all issues but Manipur," says JD(U) MP Rajiv Ranjan Singh on Opposition MPs' two-day visit to Manipur to assess the ground… pic.twitter.com/wbrtGucjVo

मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरत आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी मणिपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन म्हणाले की, विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ शनिवार आणि रविवारी राज्याचा दौरा करणार आहेत. शिष्टमंडळात समाविष्ट असलेले खासदार राज्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. पंतप्रधान मोदींनी या विषयावर संसदेत निवेदन द्यावे, असेही हुसेन म्हणाले. दरम्यान मणिपूरचा दौरा करुन तेथील परिस्थिती जाणून घेऊन सोमवारी विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

#WATCH | Don't do politics on this issue...Till now, the PM has not even tried to visit Manipur. Today, after a jolt from the Opposition the Centre has woken up, says Congress MP Adhir Ranjan Chowdhury on Opposition MPs' visit to Manipur. pic.twitter.com/RxyJtjUvpk

आम्ही मणिपूरच्या नागरिकांना भेटू. राज्य अनेक महिन्यांपासून जळत असून शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. पंतप्रधान मणिपूर वगळता सर्व मुद्द्यांवर बोलत असल्याचा हल्लाबोल जेडीयू खासदार राजीव रंजन सिंह यांनी केला.

हेही वाचा-

  1. Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक सलग सातव्या दिवशी आक्रमक, लोकसभा सोमवारपर्यंत तर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
  2. Manipur viral video : मणिपूरमधील महिलांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Last Updated : Jul 29, 2023, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.