ETV Bharat / bharat

प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेत तहकुबीची नोटीस गदारोळानंतर राज्यसभा लोकसभा तासाभरासाठी तहकूब

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत राजकीय अजेंडांसाठी केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतल्याबद्दल कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली आहे. दरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच. गदारोळ सुरू झाला. त्यानंतर तासाभरासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.

प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेत ईडी, सीबीआय यंत्रणांच्या गैरवापराबाबत कामकाज तहकुबीची नोटीस

author img

By

Published : Aug 1, 2022, 10:04 AM IST

Updated : Aug 10, 2022, 6:03 PM IST

नवी दिल्ली - संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत, राजकीय अजेंडांसाठी केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतल्याबद्दल कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच. गदारोळ सुरू झाला. त्यानंतर तासाभरासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.

खर्गे यांचीही भाजपवर टीका : भाजपला 'विरोधकमुक्त' संसद हवी आहे. म्हणूनच संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. महागाई, गुजरात दारूकांडाची शोकांतिका हे मुद्दे आम्ही संसदेत मांडू राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संसदेत राज्यसभेत आज या विषयावरुन गदारोळ होईल हीच शक्यता जास्त आहे.

शशी थरूर यांचीही चर्चेची मागणी: लोकसभेत महागाईवर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. हा विषय मोठा आहे. लोकांच्या जवळचा आहे. त्यामुळे यासंदर्भात संसदेत चर्चा ही झालीच पाहिजे. असे खा. शशी थरुर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. पावसाळी अधिवेशनातील आमच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असेही काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणालेत.

राऊत यांची आज न्यायालयात हजेरी : पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सायंकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक आजच्या तारखेला 1 ऑगस्ट 2022 रोजी झाली. आज सकाळी 9:30 वाजता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut medical check up ) यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची ( Sanjay Raut PMLA court ) सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांना ईडीकडून अटक : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या घरी काल सकाळी 7 ते सध्याकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना कार्यालयात नेले व तेथे चौकशी केली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास राऊत यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक घराबाहेर जमले होते. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी खिडकीतून समर्थकांकडे हातवारे देखील केले होते.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पीएमएलए न्यायालयात करण्यात येणार हजर

हेही वाचा - Case Against Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.. स्वप्ना पाटकर प्रकरणात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Aug 10, 2022, 6:03 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.