भोपाळ : राजधानी भोपाळमध्ये आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव तसेच उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांना शपथ दिली. आज झालेल्या या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाला सुमारे 10 हजार लोक उपस्थित होते.
-
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय सह संगठन मंत्री श्री @shivprakashbjp जी, प्रदेश के निवृतमान मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी, प्रदेश अध्यक्ष व सांसद श्री @vdsharmabjp जी एवं प्रदेश संगठन महामंत्री श्री @HitanandSharma जी के साथ लाल परेड मैदान पहुंचकर, बुधवार 13 दिसंबर को हो… pic.twitter.com/yjRHYffCCV
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) December 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय सह संगठन मंत्री श्री @shivprakashbjp जी, प्रदेश के निवृतमान मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी, प्रदेश अध्यक्ष व सांसद श्री @vdsharmabjp जी एवं प्रदेश संगठन महामंत्री श्री @HitanandSharma जी के साथ लाल परेड मैदान पहुंचकर, बुधवार 13 दिसंबर को हो… pic.twitter.com/yjRHYffCCV
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) December 12, 2023भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय सह संगठन मंत्री श्री @shivprakashbjp जी, प्रदेश के निवृतमान मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी, प्रदेश अध्यक्ष व सांसद श्री @vdsharmabjp जी एवं प्रदेश संगठन महामंत्री श्री @HitanandSharma जी के साथ लाल परेड मैदान पहुंचकर, बुधवार 13 दिसंबर को हो… pic.twitter.com/yjRHYffCCV
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) December 12, 2023
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपच्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्यानं यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल स्टेडियमवर सुरक्षेची सर्व तयारी करण्यात आली होती. एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी भोपाळ गाठून तयारीची पाहणी केली होती.
-
#WATCH | Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Union Minister Nitin Gadkari, Maharashtra CM Eknath Shinde, Uttar Pradesh CM Yogi Adityanath and Uttarakhand CM Pushkar Singh Dhami arrive at the venue of the swearing-in ceremony of Madhya Pradesh… pic.twitter.com/L9hiPjfCkb
— ANI (@ANI) December 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Union Minister Nitin Gadkari, Maharashtra CM Eknath Shinde, Uttar Pradesh CM Yogi Adityanath and Uttarakhand CM Pushkar Singh Dhami arrive at the venue of the swearing-in ceremony of Madhya Pradesh… pic.twitter.com/L9hiPjfCkb
— ANI (@ANI) December 13, 2023#WATCH | Union Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, Union Minister Nitin Gadkari, Maharashtra CM Eknath Shinde, Uttar Pradesh CM Yogi Adityanath and Uttarakhand CM Pushkar Singh Dhami arrive at the venue of the swearing-in ceremony of Madhya Pradesh… pic.twitter.com/L9hiPjfCkb
— ANI (@ANI) December 13, 2023
मोतीलाल स्टेडियममध्ये बांधण्यात आले 3 हेलिपॅड : मोतीलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेरील लाल परेड मैदानावर तीन स्वतंत्र हेलिपॅड बांधण्यात आले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानानं भोपाळ विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं लाल परेड मैदानावर पोहोचले होते. येथे व्हीव्हीआयपी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चोवीस तास परिश्रम घेऊन स्टेडियम नववधूप्रमाणे सजवलं होतं. यासोबतच इतर जिल्ह्यांतूनही काही अतिरिक्त फौजा मागवण्यात आल्या होत्या.
10 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था : मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मोठा घुमट बांधला होता. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि योगी यांच्या सहभागामुळे येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. याशिवाय मोतीलाल मैदान आणि आजूबाजूच्या रस्त्यांची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली होती. श्यामला टेकडी ते लाल परेड या रस्त्यावरही डांबरीकरण करण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा : माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री म्हणाले, "सध्या मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था सुरळीत राहण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यक्रम भव्य होईल. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही."
हेही वाचा :