ETV Bharat / bharat

Kalichran Maharaj : कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने - Kalicharan Controversial Statement

महात्मा गांधींवर वादग्रस्त ( Kalicharan Controversial Statement ) वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अखेर आज छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो ( Kalicharan Maharaj Arrested from Khajuraho ) येथून अटक केली आहे. कालीचरण महाराजांच्या अटकेवरून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने आले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेश
Kalichran Maharaj
author img

By

Published : Dec 30, 2021, 12:32 PM IST

Updated : Dec 30, 2021, 12:40 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी ( Objectionable Remarks on Mahatma Gandhi ) छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजांना अटक ( Kalicharan Maharaj Arrested ) केली. कालीचरण महाराजांच्या अटकेवरून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सरकार आमने-सामने आले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

छत्तीसगढ पोलिसांनी कालीचरण महाराजांना अटक करून आंतरराज्यीय प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे मिश्रा यांनी म्हटलं. त्यांनी या अटकेवर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलीस महासंचालक यांना छत्तीसगढ पोलीस महासंचालकाशी बोलून अटक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्यास मध्य प्रदेश सरकारने सांगितले आहे. तसेच छत्तीसगढ पोलिसांकडून अटकेप्रकरणी खुलासा मागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कालीचरण यांच्या अटकेसंदर्भात छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना कळवायला हवे होते, असे नरोत्तम मिश्रा म्हणाले. यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. 'न्याय देण्यास इतका उशीर होऊ नये, की तो अन्यायासारखा वाटू लागेल', असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं.

बघेल यांचे टि्वट -

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यांनी टि्वट करून कालीचरण यांच्यावरील कारवाईसंदर्भात माहिती दिली आहे. छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्या कुटुंबीयांना आणि वकिलाला त्यांच्या अटकेची माहिती दिली आहे. त्याला 24 तासांत न्यायालयात हजर केले जाईल.

काँग्रेसची टिका -

काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी कालीचरण यांच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित करणारे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. या अटकेबाबत त्यांनी शिवराज सरकारच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'या कारवाईचे स्वागत करण्याऐवजी गृहमंत्री त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक करायला हवी होती. मात्र, शिवराज सरकार त्यांना संरक्षण देत असल्याचे दिसते, असे नरेंद्र सलुजा म्हणाले.

काय प्रकरण ?

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’मध्ये कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून महात्मा गांधींवर प्रक्षोभक ( Kalicharan Controversial Statement ) भाष्य केले होते. महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये घराणेशाही वाढवण्याचे काम केले. पंडित नेहरूंऐवजी सरदार पटेल यांच्याकडे सत्ता सोपवली असती तर देश अमेरिकेच्या पुढे गेला असता, असे ते म्हणाले. महात्मा गांधी हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे जनक आहेत. ते राष्ट्रवादाचे जनक नाहीत, म्हणून ते त्यांना राष्ट्रपिता मानत नाही, असेही ते म्हणाले. या भाषणावरून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत आगीत तेल ओतण्याचे काम केले. गांधींना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्याचा मला पश्चाताप नाही. मी गांधींचा तिरस्कार करतो. गांधींनी हिंदूंसाठी काय केले?, असे त्यांनी म्हटलं होतं. यानंतर कालीचरण महाराजाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा - FIR against Kalicharan Maharaj : महात्मा गांधींबाबत विवादित वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

Last Updated : Dec 30, 2021, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.