भोपाळ MP BJP Manifesto : भारतीय जनता पार्टीनं मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६ दिवस आधी आपला जाहीरनामा जारी केला. पक्षानं त्याला 'संकल्प पत्र' असं नाव दिलंय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही प्रॉमिसरी नोट जारी करण्यात आली. या संकल्प पत्रात 'मोदींच्या गॅरंटी'चा उल्लेख आहे. संकल्प पत्रात महिला, युवक आणि शेतकरी यांच्यावर सर्वाधिक भर देण्यात आलाय.
पुढील ५ वर्षे मोफत रेशन : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पुढील ५ वर्ष सर्व कुटुंबांना डाळ, मोहरीचं तेल आणि तांदूळ मोफत दिलं जाईल, अशी हमी भाजपाच्या संकल्प पत्रात देण्यात आली आहे. याशिवाय अनुदानित दरात साखर पुरवण्यात येईल. तसंच मध्य प्रदेशातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, यासाठी पंतप्रधान आवास योजनेसोबतच मुख्यमंत्री सार्वजनिक गृहनिर्माण योजना सुरू करण्यात येणार आहे.
'लाडली बहन' योजनेवर फोकस असणार : संकल्प पत्रात मासिक आर्थिक मदतीसोबतच लाडली बहन योजनेअंतर्गत मोफत घर देण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. तसेच एमएसपीसह गहू २,७०० रुपये प्रति क्विंटल आणि ३,१०० रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करण्याची व्यवस्था करण्याचाही ठराव आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक १२,००० रुपये देणार आहेत. तर तेंदूपत्ता संकलन दर ४,००० रुपये प्रति पिशवी देण्याची खात्री केली जाईल.
प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार : संकल्प पत्रात गरीब कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबतच सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनासोबत पौष्टिक नाश्ताही दिला जाणार आहे. प्रत्येक विभागात आयआयटीच्या धर्तीवर मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एम्सच्या धर्तीवर मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी सुनिश्चित केली जाईल.
हेही वाचा :