लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मथुरा नदीच्या पात्रात वाहत आलेल्या भांड्यामध्ये नवजात बाळ आढळून आले आहे. स्थानिकांना हे बाळ दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या बाळाला वाचवले. त्यानंतर त्या बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. चाईल्डलाईन पथकही यावेळी सोबत होते. डॉक्टर किशोर माथुर यांनी बाळाची तब्येत ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले. या बाळाचे वजन तीन किलो असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
बाळ तृतीयपंथी असल्यामुळे सोडल्याचा संशय..
रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हे बाळ तृतीयपंथी असल्याचे सांगितले. यामुळेच बाळाच्या आईने त्याला सोडून दिले असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. सध्या या बाळाची प्रकृती चांगली असून, पोलीस त्याच्या आईचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : सहा वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या; राजस्थानातील संतापजनक प्रकार