बंगळुरू (कर्नाटक): पोलीस सुत्राने सांगितले की, शांताचे लग्न जड्डेहल्ली गावात झाले होते. बाळंतपणासाठी ती तिच्या मूळ गावी कुप्पागड्डे येथे आली होती. नुकताच तिने मुलाला जन्म दिला. पण बाळाला देण्यासाठी दूध कमी असल्याने तिची चिडचीड सुरू होती. पुरेसे दूध मिळत नसल्याने बाळदेखील सतत रडायचे. मुलाचा शारीरिक योग्य विकास होत नसल्याने तिला मानसिक त्रास होता.
महिलेने दीड महिन्याच्या बाळासह गावात आत्महत्या केली. या घटनेने गावात अनेकांना धक्का बसला आहे. बालक तलावात तरंगत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर ही घटना उजेडात आली. ही बाब कळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तलावात शोध घेतला. त्यांनी महिला आणि मुलाला तलावातून बाहेर काढले, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अनवट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवर्षी 45 हजार मातांचे भारतात मृत्यू जगभरात दरवर्षी लाखो मातांचा मृत्यू होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. जगभरातील एकूण मातांच्या मृतांच्या 12 टक्के मातांचा मृत्यू भारतात होतो. देशात तब्बल 45 हजार मातांचे दरवर्षी होत असल्याने हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो. भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्यावतीने 2003 मध्ये कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
बाळाला दूध पाजण्याच्या समस्येवर आहेत हे मार्ग बऱ्याचदा पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना बाळाला दूध पाजताना समस्येचा सामना करावा लागतो. अशात काही वस्तू महिलांना स्तनपानासाठी मदत करू शकतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे व योग्य आहार केल्याने मदत होऊ शकते. शारीरिक समस्या, अनुभवाची कमतरता आणि संतुलित आहाराचा अभाव अशा परिस्थितीमुळे मातेला दुधाचे कमी प्रमाण येऊ शकते. मुलांना सांभाळण्यासोबतच घराचे आणि ऑफिसचे काम करणे मातांना कठीण जाते. कारण, अशा मातांना गरजेप्रमाणे बाळाला स्तनपान देखील करावे लागते. त्यासाठी मिल्क स्टोरेज बॅगचा वापर करण्यात येऊ शकतो. माता आपले दूध या बॅगमध्ये एकत्रित करून हव्या त्यावेळी बॅगने बाळाला दूध पाजू शकतात.